प्रतिनिधी
मुंबई : गुजरात विधानसभेच्या निवडणुका डिसेंबर 2022 पूर्वी होणे नियोजित वेळेत अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर एबीपी – सी व्होटरने केलेल्या सर्वेक्षात काही निष्कर्ष आले आहेत. या सर्वेक्षणात गुजरात मध्ये पुन्हा एकदा भाजप जिंकणार असा निष्कर्ष आहे… पण मूळात यात बातमी नाही… सर्वेक्षणाच्या दुसऱ्या निष्कर्षात मात्र बातमी आहे…, ती म्हणजे अरविंद केजरीवालांची आम आदमी पार्टी काँग्रेसला मागे टाकणार आहे!!… याचा अर्थ गुजरात मध्ये भाजप पहिल्या क्रमांकावर, आम आदमी पार्टी दुसऱ्या क्रमांकावर आणि काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर राहणार आहे, असा एबीपी – सी व्होटरच्या सर्वेक्षणाचा निष्कर्ष आहे. Gujrat assembly elections : ABP – CVoter Survey shows AAP surging ahead of Congress in a big way, ofcourse BJP is winning
गुजरात मध्ये गेल्या चार विधानसभांच्या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस यांच्या जोरदार टक्कर झाली होती. या आधीच्या 2017 च्या निवडणुकीत भाजपला शंभरीच्या आत म्हणजे 99 जागांवर रोखण्यात काँग्रेस यशस्वी झाली होती. या पार्श्वभूमीवर गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पार्टीची दमदार एन्ट्री काँग्रेससाठी राजकीय डोकेदुखी ठरल्याचे सर्वेक्षणाच्या निष्कर्षातून दिसत आहे.
या सर्वेक्षणात 65,621 मतदारांनी सहभाग नोंदवला आहे.
या सर्वेक्षणातील काही प्रश्न आणि त्यांना मिळालेली मतांची टक्केवारी अशी :
गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीत कोणता मुद्दा प्रभावी ठरणार?
ध्रुवीकरण -18% राष्ट्रीय सुरक्षा – 28% मोदी-शाह यांचं काम – 15% राज्य सरकारचं काम – 16% आम आदमी पार्टी -18% इतर – 5 %
भाजप – 63% काँग्रेस – 9% आप – 19% अन्य – 2% त्रिशंकू – 2% माहित नाही – 5%
नाराज आहे, सत्तांतर हवेय -34% नाराज आहे, सत्तांतर नको -40% नाराज नाहीत, सत्तांतरही नकोय -26%
चांगलं -60% सरासरी -18% खराब-22%
चांगलं -36% सरासरी- 35% खराब- 29%
चांगलं – 42% सरासरी – 26% खराब – 32%
बेरोजगारी – 31% महागाई – 8% पायाभूत सुविधा – 16% कोरोनातील काम -4% शेतकरी -15% न्याय व्यवस्था -3% भ्रष्टाचार -7% राष्ट्रीय मुद्दा -3% इतर -13%
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App