Government cancles decision to cut small savings interest rates

WATCH : सर्वसामान्यांना दिलासा, छोट्या योजनांवरील व्याजदर कपातीचा निर्णय केंद्राकडून रद्द!

small savings interest rates | विविध सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक एप्रिलपासून महत्त्वाचा बदल होणार होता… मात्र केंद्र सरकरनं अनेक गुंतवणूक योजनांमधील व्याजदरांमध्ये केलेली कपात रद्द केल्यानं छोटी गुंतवणूक करणाऱ्यांसह सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. एक एप्रिलपासून आता या योजनांवर नवे व्याजदर लागू होणार होते. तसे जाहीरही करण्यात आले होते. पण अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक एप्रिलला सकाळीच ट्वीट करून हा निर्णय रद्द केल्याचे स्पष्ट केले. या सर्व बचत योजनांवरील व्याजदर मार्च महिन्यातील व्याजदरांप्रमाणेच राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. आदी जाहीर केलेल्या निर्णयानुसार PPF, NSC, KVP, ज्येष्ठ नागरिक बचत योजना आणि सुकन्या समृद्धि योजनांसारख्या योजनांवरील व्याजदर हे 50 ते 100 बेस पॉइंटने कमी करण्यात आले होते. 2021-22 च्या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीसाठी ही कपात लागू असणार होती, पण सरकारनं हा निर्णय मागे घेतलाय… Government cancles decision to cut small savings interest rates

हेही वाचा..

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*