आयपीपीबीच्या देशभरात 650 शाखा असून 1,36,000 बँकिंग सुविधा पोहोच केंद्र आहेत.Good news ! You can get cheap home loan from the post now, read on
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे.आता गृहकर्ज घेण्यासाठी तुम्हाला बँकेत जाव लागणार नाही.नजीकच्या पोस्ट ऑफिसमधूनही आता तुम्ही स्वत गृहकर्ज घेऊ शकता.
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने (आयपीबीसी ) एलआयसी हाऊसिंग फायनान्स सोबत भागिदारी केली असून आयपीपीबीच्या 4.5 कोटी ग्राहकांना यामुळे एलआयसी-एचएफएलच्या गृहकर्जाची सुविधा उपलब्ध होईल.
मिळालेल्या माहितीनुसार आयपीपीबीच्या देशभरात 650 शाखा असून 1,36,000 बँकिंग सुविधा पोहोच केंद्र आहेत.त्यांच्या माध्यमातून आयपीपीबी वेतनधारी नोकरदारांना 50 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देऊ शकेल.या कर्जाचा प्रारंभिक व्याजदर अवघा 6.6% असेल.
ज्या भागात बँकिंग सुविधा पोहचलेल्या नाहित अथवा अल्प प्रमाणात पोहोचलेल्या आहेत. अशा भागात स्वस्त गृहकर्जाची सुविधा या भागिदारीच्या माध्यमातून आयपीपीबी पोहोचवणार आहे.विमा कंपन्यांसोबत काम करण्याची आयपीपीबीची ही काय पहिलीची वेळ नाही.
दोन्ही कंपन्यांनी एक निवेदन जारी करून या भागिदारीची माहिती दिली आहे.या निवेदनात म्हटले आहे की आयपीपीबीकडे 2 लाख डाक कर्मचाऱ्यांचे मोठे नेटवर्क आहे. ग्रामीण भागातही हे नेटवर्क काम करते. हेच कर्मचारी गृहकर्जाच्या वितरणात महत्वाची भूमिका निभावली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App