रामभक्तांसाठी आनंदाची बातमी, श्री रामायण यात्रेसाठी एसी पर्यटक रेल्वे, अयोध्येपासून नाशिकपर्यंत श्रीरामांच्या जीवनातील सर्व स्थळांना देणार भेट


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने रामभक्तांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. प्रभु श्रीरामांच्या जीवनातील सर्व स्थळांना रेल्वेने भेट देण्यासाठी श्री रामायण यात्रा सुरू करण्यात आली आहे. वातानुकुलित (एसी) रेल्वेने अयोध्येपासून ते नाशिकपर्यंतच्या तीर्थक्षेत्रांना भेट देता येणार आहे.Good news for Ram devotees, AC tourist train for Shri Ramayana Yatra, will visit all places of Shri Ram’s life from Ayodhya to Nashik

देखो अपना देश उपक्रमाअंतर्गत इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉपोर्रेशनने धार्मिक पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी डिलक्स एसी टूरिस्ट ट्रेनद्वारे ही श्री रामायण यात्रा सुरू केली आहे. ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील सफदरजंग रेल्वे स्थानकापासून सुरू होईल. प्रभु श्रीरामाच्या जीवनाशी संबंधित सर्व प्रमुख ठिकाणांच्या भेटीचा समावेश असेल. सतरा दिवसांच्या यात्रेत अयोध्या हा पहिला थांबा असेल.याठिकाणी श्री राम जन्मभूमी मंदिर आणि हनुमान मंदिर आणि त्याशिवाय नंदीग्राम येथील भारत मंदिरला भेट देता येणार आहे. त्यानंतर सीता जन्मस्थान असलेल्या सीतामढी आणि नेपाळ येथील राम जानकी मंदिराला रस्ते मार्गाने भेट दिली जाणार आहे.

तेथून रेल्वे वाराणसीला जाईल. वाराणसी, प्रयाग, शृंगवेरपूर आणि चित्रकूट येथे रस्तेमार्गाने प्रवास होई . चित्रकूट येथे रात्रीचा मुक्काम होईल. पुढचा थांबा नाशिक येथे असेल. याठिकाणी पंचवटी येथे भेट दिली जाईल. त्यानंतर हंपी आणि रामेश्वरम हे यात्रेचे शेवटचे ठिकाण असेल. या यात्रेत एकूण साडेसात हजार किलोमीटरचा प्रवास होणार आहे.

ही डिलक्स एसी ट्रेन अत्याधुनिक असणार आहे. दोन रेस्टॉरन्ट, अत्याधुनिक स्वयंपाकघर, शॉवरची सुविधा, सेन्सर-आधारित वॉशरूम, पाय मालिश करणारी यंत्रणा असणार आहे. प्रथम एसी आणि द्वितीय एसी अशा प्रकारचे डबे असणार आहेत. प्रत्येक डब्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षा रक्षक असतील.

आयआरसीटीसीने या ट्रेनचे एका व्यक्तीसाठी ८२,९५० रुपये असणार आहे. यामध्ये एसी प्रवास, एसी हॉटेलमधील निवास, रस्ते मार्गाने एसी वाहनांची विविध ठिकाणी भेटी, प्रवासी विमा आणि टूर मॅनेजरची सेवा मिळणार आहे.या ट्रेनमध्ये केवळ १८ वर्षांवरील नागरिकांनाच प्रवास करता येणार असून त्यांचे लसीचे दोन्ही डोस पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे.

Good news for Ram devotees, AC tourist train for Shri Ramayana Yatra, will visit all places of Shri Ram’s life from Ayodhya to Nashik

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण