Golden Boy Niraj Chopra : गोल्डन बॉयला खेलरत्न ! नीरज चोप्रा-लव्हलिना आणि मितालीसह ११ खेळाडूंना मिळणार पुरस्कार


मागील वर्षात ५ खेळाडूंची निवड खेलरत्न पुरस्कारासाठी करण्यात आली होती. २०१६ मध्ये रियो ऑलम्पिकच्या नंतर ४ खेळाडूंना हा पुरस्कार मिळाला होता. या अर्थाने, यावेळी कोणत्याही एका वर्षात सर्वाधिक खेळाडूंची खेलरत्नसाठी निवड करण्यात आली आहे.Golden Boy Khel Ratna! Neeraj Chopra-Lovelina


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार समितने टोक्यो ऑलम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक मिळवणाऱ्या भालाफेकपटू नीरज चोप्रासह ११ खेळाडूंची नावे २०२१ च्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी प्रस्तावित केली आहेत. यामध्ये पाच पॅरा अॅथलीट्सचा सुद्धा समावेश आहे.

नीरज व्यतिरिक्त, रवी दहिया (कुस्ती), पीआर श्रीजेश (हॉकी), लव्हलिना बोरगोहेन (बॉक्सिंग), सुनील छेत्री (फुटबॉल), मिताली राज (क्रिकेट), प्रमोद भगत (पॅरा बॅडमिंटण), सुमित अंतिल (पॅरा बॅडमिंटण), अशी नावे आहेत. अवनी लेखरा (पॅरा नेमबाजी), कृष्णा नगर (पॅरा बॅडमिंटण) आणि एम नरवाल (पॅरा नेमबाजी) उपस्थित आहेत. समितीने अर्जुन पुरस्कारासाठी ३५ खेळाडूंची नावे सुचवली आहेत. या ३५ खेळाडूंमध्ये क्रिकेटर शिखर धवनच्या नावाचाही समावेश आहे.काही महिन्यांपूर्वीचं बदललं पुरस्काराचं नाव

खेलरत्न हा देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार आहे. याआधी भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावावरून हे नाव देण्यात आले होते. नरेंद्र मोदी सरकारने नुकतेच या पुरस्काराला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे नाव दिले आहे.

Golden Boy Khel Ratna! Neeraj Chopra-Lovelina

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती