विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या आरोपांना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आकडेवारीनेच उत्तर दिले आहे. आपण पंतप्रधान असताना अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी पुरेसे काम केले नाही. आज जेव्हा जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारताची ओळख असताना त्यावर टीका का करता, असा सवालही त्यांनी केला आहे.Giving statistics, Nirmala Sitharaman responds to Manmohan Singh’s allegations, saying that you have not been able to control inflation for 22 months
पंजाब विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मनोमहन सिंह यांचा पंजाबी भाषेतला एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. यामध्ये त्यांनीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अर्थिक धोरणांवर टीका केली आहे. करोना काळात केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आर्थिक घडी विस्कटली, बेरोजगारी वाढली आणि महागाईत वाढ झाली, यामुळे सर्वसामान्य जनता त्रासली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
यावर सीतारामन म्हणाल्या, निवडणुकीच्या राजकारणासाठी मनमोहन सिंग यांनी अर्थव्यवस्थेवर केलेले वक्तव्य भारताला खाली खेचणार आहे. भारत जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून पुढे येत आहे. त्याला नख लावण्याचे प्रयत्न मनमोहन सिंग यांनी केले आहे.
सीतारामन म्हणाल्या, भारताच्या अर्थव्यवस्थेची अवस्था नाजूक करणारे पंतप्रधान म्हणूनच मनमोहन सिंग यांचे नाव कायम लक्षात ठेवले जातील. भारतीय अर्थव्यवस्थेचा तो काळा इतिहास आहे. ते असे पंतप्रधान होते की ज्यांना सतत २२ महिने महागाई नियंत्रणात ठेवता आली नव्हती.
त्यांच्या काळात भारताची परकीय गंगाजळी 275 अब्ज डॉलर्स होती. गेल्या सात वर्षांत त्यामध्ये तीन पट वाढ होऊन हा साठा 630 अब्ज झाला आहे. तरीही त्यांना अचानक अर्थव्यवस्थेची आठवण होतेय यामागे निवडणुकीचे राजकारण आहे.
मनमोहन सिंग ज्या सर्वसमावेशकतेचा संदर्भ देत आहेत तो पंजाबमध्ये आठवला नाही का? असा सवालही सीतारामन यांनी केला आहे. त्या म्हणाल्या, पंजाबमध्ये फायदा कमाविण्यासाठी धनाढ्यांना लस विकल्या गेल्या तेव्हा ते का बोलले नाहीत?
डॉ. मनमोहन सिंग, मला तुमच्याबद्दल खूप आदर होता. पण तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती असा हल्लाबोल करत सीतारामन म्हणाल्या देशाचा एक विद्वान पंतप्रधान जे स्वत: अर्थशास्त्रज्ञ देखील आहेत ते केवळ निवडणुकीच्या राजकारणासाठी भारताची बदनामी करतात. कोविड महामारीच्या काळातही सर्वाधिक वेगाने वाढणाºया भारतीय अर्थव्यवस्थेला तुम्हाला खाली आणायचे आहे का?
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App