वृत्तसंस्था
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात काँग्रेसचे माजी नेते गुलाम नबी आझाद यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले. ते म्हणाले, मी अनेक मुद्द्यांवर पीएम मोदींवर कितीतरी प्रखर टीका केली, परंतु ते नेहमी उदार राहिले. त्यांनी कधीही सूडाचे राजकारण केले नाही. एखाद्या कोमल हृदयी राजकारण्यासारखे त्यांचे वर्तन राहिले. कलम 370 आणि सीएएसह अनेक मुद्द्यांवर त्यांच्या विरोधात कठोर विधाने करूनही त्यांनी बदला घेण्याचा प्रयत्न केला नाही.Ghulam Nabi Azad said- PM Modi has never done politics of revenge, referring to Article 370 and targeting Congress leaders
गुलाम नबी आझाद म्हणाले, ‘मी पंतप्रधान मोदींना त्याचे योग्य श्रेय द्यायला हवे, मी त्यांच्याशी जे काही वागलो तरीही ते माझ्यासाठी खूप उदार होते. विरोधी पक्षनेता या नात्याने मी त्यांना कोणत्याही मुद्द्यावर सोडले नाही, मग ते कलम 370 असो, सीएए असो किंवा हिजाब असो, पण असे असतानाही त्यांनी कधीही त्यांचा बदला घेतला नाही.
आझाद यांनी पंतप्रधान मोदींची जाहीर स्तुती करण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2021 मध्येदेखील ते म्हणाले होते, त्यांना पंतप्रधानांबद्दलची वस्तुस्थिती आवडते ज्यामध्ये पंतप्रधान आपला भूतकाळ लपवत नाहीत आणि ते जे करतात त्याचा त्यांना अभिमान आहे.
I must give credit to Modi. For what I did to him, he was too generous. As Leader of the Opposition I did not spare him on any issue be it Article 370 or CAA or hijab. I got some Bills totally failed but I must give him the credit that he behaved like a statesman, not taking… pic.twitter.com/0jRFdBC9cy — ANI (@ANI) April 4, 2023
I must give credit to Modi. For what I did to him, he was too generous. As Leader of the Opposition I did not spare him on any issue be it Article 370 or CAA or hijab. I got some Bills totally failed but I must give him the credit that he behaved like a statesman, not taking… pic.twitter.com/0jRFdBC9cy
— ANI (@ANI) April 4, 2023
गुलाम नबी यांच्या ‘आझाद’ या आत्मचरित्राचे बुधवारी लोकार्पण होत आहे. काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री करण सिंह हे त्याचे लोकार्पण करणार आहेत. आत्मचरित्रात आझाद यांनी खुलासा केला आहे की, गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याची घोषणा राज्यसभेत केली. त्यांनी जम्मू-काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केले. याविरोधात विरोधी पक्षनेत्यांनी धरणे आंदोलन केले. यात काँग्रेसचे मीडिया प्रभारी जयराम रमेश आले नव्हते. तेव्हा ते राज्यसभेत पक्षाचे मुख्य व्हिप होते.
आझाद पुस्तकाच्या पान 251 वर लिहितात– जेव्हा अमित शहा यांनी कलम 370 हटवण्याची घोषणा केली, तेव्हा मी इअर फोन फेकून दिला आणि वेलजवळ जाऊन निषेध करण्यासाठी धरणे दिले. मी विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही तिथे बोलावले होते, पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की जयराम रमेश एकटेच त्यांच्या जागेवर बसले, धरणे आंदोलनात सहभागी झाले नाहीत.
ऑगस्ट 2022 मध्ये आझाद म्हणाले की, त्यांनी मोदींना “क्रूर माणूस” मानले होते, परंतु नंतर त्यांनी पंतप्रधानांबद्दलची त्यांची धारणा बदलली. विशेष म्हणजे ज्या दिवशी गुलाम नबी आझाद यांचा राज्यसभेतील संसदीय कार्यकाळ संपत होता त्याच दिवशी संसदेत आझाद यांचे कौतुक करताना पंतप्रधान मोदीही भावुक झाले होते. काही दिवसांनी आझाद यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आणि स्वतःचा पक्ष स्थापन केला होता.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App