वृत्तसंस्था
जयपूर : राजस्थानात काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना मंत्रिमंडळात फेरबदल करणा-याला भाग पाडल्यानंतर नव्या १५ मंत्र्यांचा शपथविधी होत आहे. त्यामुळे काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट आनंदले आहेत. त्यांनी स्वतःहून पत्रकार परिषद घेत नव्या मंत्रिमंडळाच्या वैशिष्ट्यांचे वर्णन केले आहे. पण त्यामुळे राजस्थान काँग्रेस मधला असंतोष कमी झालेला नसून काही आमदारांनी हा मंत्रिमंडळ विस्तार पुरेसा सर्वसमावेशक नसल्याची टीका केली आहे. Gehlot cabinet reshuffle in Rajasthan; Sachin Pilot happy; But MLA Shafia Zubair is sad !!
काँग्रेसच्या आमदार शफिया झुबैर यामध्ये आघाडीवर आहेत. राजस्थानात मंत्रिमंडळाचा विस्तार पुरेसा सर्वसमावेशक नाही. महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याची घोषणा पक्षाच्या नेत्यांनी केली असली तरी मंत्रिमंडळात महिलांना तेवढे स्थान मिळालेले नाही, अशा शब्दांमध्ये आमदार शफिया झुबैर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ज्यांची समाजात प्रतिमा खराब आहे त्यांना बढती देण्यात आल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पण निदान मंत्रिमंडळात काहीसा जातीय समतोल राखण्यात आली असेल, त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या निवेदनातून राजस्थान काँग्रेस मधला असंतोष बाहेर आला आहे.
राजस्थानात बऱ्याच वर्षांपासून दलित मंत्री नव्हते. आता चार दलित नेत्यांना मंत्रिपदे देण्यात आली आहेत. ओबीसी वर्ग, अल्पसंख्यांक यांच्याकडेही लक्ष देऊन त्यांचे प्रतिनिधित्व मंत्रिमंडळात वाढविण्यात आले आहे, अशी माहिती सचिन पायलट यांनी दिली आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाची सचिन पायलट यांनी प्रशंसा केली आहे.
The Cabinet's structure could've been better. Those with a bad reputation have been promoted. Overall, Cabinet is not sending a good message. Women (MLAs) didn't get 33% reservation (in the Cabinet): Congress MLA Shafia Zubair on Rajasthan Cabinet reshuffle pic.twitter.com/gh0NFGSOS4 — ANI (@ANI) November 21, 2021
The Cabinet's structure could've been better. Those with a bad reputation have been promoted. Overall, Cabinet is not sending a good message. Women (MLAs) didn't get 33% reservation (in the Cabinet): Congress MLA Shafia Zubair on Rajasthan Cabinet reshuffle pic.twitter.com/gh0NFGSOS4
— ANI (@ANI) November 21, 2021
सोनिया गांधी यांना मी मध्यंतरी भेटलो होतो. राजस्थानातील सर्व राजकीय परिस्थितीने त्यांच्या कानावर घातली होती. त्यांनी त्या परिस्थितीचे आकलन करून योग्य तो निर्णय घेतला. त्यामुळे आज मंत्रिमंडळात फेरबदल होऊन ते सर्वसमावेशक बनते आहे. 2023 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पुन्हा सत्तेवर येईल. काँग्रेस पक्षाचे नेतृत्व मला जी जबाबदारी देईल, ती मी समर्थपणे सांभाळीन, असा विश्वास सचिन पायलट यांनी व्यक्त केला आहे.
मंत्रिमंडळ हे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असते. राजस्थानात मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या मंत्रिमंडळात फेरबदल होत आहेत. परंतु त्याचे विश्लेषण आणि वैशिष्ट्यांचे वर्णन मात्र सचिन पायलट करताना दिसत आहेत. याचा सरळ राजकीय आज काँग्रेसमध्ये सचिन पायलट गटाला आता काँग्रेस श्रेष्ठींनी महत्त्व द्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे सचिन पायलट पुढे येऊन सध्या सगळे बोलत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App