Gautam Adani : अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी आता आशियातील दुसर्या श्रीमंत व्यक्तीचा मुकुट गमवला आहे. त्यांच्या जागेवर झोंग शानशान (नेटवर्थ 69.3 अब्ज डॉलर्स) हे चिनी उद्योगपती आले आहेत. अदानी समूहाच्या सर्व सहा सूचीबद्ध कंपन्यांचे समभाग आज घसरले. यामुळे अदानींची संपत्ती 3.91 अब्ज डॉलर्सनी कमी झाली आहे. Gautam Adani Now Not Second Richest Of Asia, Read Wealth Of 10 Richest Persons in World
विशेष प्रतिनिधी
मुंबई : अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी आता आशियातील दुसर्या श्रीमंत व्यक्तीचा मुकुट गमवला आहे. त्यांच्या जागेवर झोंग शानशान (नेटवर्थ 69.3 अब्ज डॉलर्स) हे चिनी उद्योगपती आले आहेत. अदानी समूहाच्या सर्व सहा सूचीबद्ध कंपन्यांचे समभाग आज घसरले. यामुळे अदानींची संपत्ती 3.91 अब्ज डॉलर्सनी कमी झाली आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, अदानी यांच्याकडे आता 67.6 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. ते आता जगातील 15 वे श्रीमंत व्यक्ती आहे. गेल्या तीन दिवसांतच त्यांची एकूण मालमत्ता 9.4 अब्ज डॉलर्स म्हणजेच 69,263 कोटी रुपयांनी घटली आहे. त्याच वेळी, यावर्षी आतापर्यंत त्यांची एकूण संपत्ती 33.3 अब्ज डॉलर्सने वाढली आहे.
अलीकडेच मीडिया रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला होता की, एनएसडीएलने तीन परदेशी फंडांची खाती गोठविली आहेत. अदानी ग्रुपच्या चार कंपन्यांमध्ये त्यांचे 43,500 कोटी रुपयांचे शेअर्स आहेत. परंतु नंतर अदानी समूहाने ही वृत्त नाकारली आणि धादांत खोटे असल्याचे म्हटले. परंतु या बातमीनंतर अदानी समूहाच्या सर्व सहा सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे. अदानी टोटल गॅस आणि अदानी ट्रान्समिशन प्रत्येकी पाच टक्के, अदानी पॉवर 6.65 टक्के, अदानी पोर्ट 7.17 टक्के, अदानी ग्रीन एनर्जी 3.10 टक्के आणि अदानी एंटरप्राईजेसमध्ये 5.77 टक्क्यांनी घसरण झाली.
रिलायन्स इंडस्ट्रीज (आरआयएल) चे मालक मुकेश अंबानी अजूनही आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. यावर्षी त्यांची संपत्ती 7.82 अब्ज डॉलर्सनी वाढली आहे. 84.5 अब्ज डॉलर्सची संपत्ती असलेली ते जगातील 12 वे श्रीमंत व्यक्ती आहे.
1. जेफ बेजोस – 198 अब्ज डॉलर्स – अमेझॉन 2. बर्नार्ड अर्नाट – 167 अब्ज डॉलर्स – LVMH 3. एलन मस्क – 167 अब्ज डॉलर्स – टेस्ला, स्पेस एक्स 4. बिल गेट्स – 144 अब्ज डॉलर्स – मायक्रोसॉफ्ट 5. मार्क झुकेरबर्ग – 123 अब्ज डॉलर्स – फेसबुक 6. लॅरी पेज – 111 अब्ज डॉलर्स – गुगल 7. सर्जी ब्रिन – 107 अब्ज डॉलर्स – गुगल 8. वॉरेन बफेट – 107 अब्ज डॉलर्स – बर्कशायर हॅथवे 9. स्टीव्ह बाल्मर – 93 अब्ज डॉलर – मायक्रोसॉफ्ट 10. फ्रेंकोइस बेटनकोर्ट मेयर्स – 92.5 अब्ज डॉलर्स – लॉरियल
Gautam Adani Now Not Second Richest Of Asia, Read Wealth Of 10 Richest Persons in World
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App