सुरतमध्ये टँकरमधून गॅस गळती , ४ कामगारांचा मृत्यू ; २५ हून अधिक जणांची प्रकृती चिंताजनक


  • मिलजवळील नाल्यात अज्ञात टँकर चालकाने विषारी केमिकल टाकलं होतं.यादरम्यान त्यातून विषारी गॅस गळती सुरु झाली. Gas leak from tanker in Surat, 4 workers killed; More than 25 people are in critical condition

विशेष प्रतिनिधी

गुजरात : गुजरातच्या सुरतमध्ये गुरुवारी सकाळी (आज) गॅस गळतीची मोठी दुर्घटना घडली आहे.प्रिटिंग मिलमध्ये झालेल्या गॅस गळती दुर्घटनेनंतर खळबळ उडाली आहे. टँकरमधून ही गॅस गळती झाल्याने गिरणीतील चार कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला आहे.तर २५ हून अधिक जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मिलजवळील नाल्यात अज्ञात टँकर चालकाने विषारी केमिकल टाकलं होतं.यादरम्यान त्यातून विषारी गॅस गळती सुरु झाली.त्यामुळे जवळच असलेल्या प्रिटींग मिलमधील कर्मचारी या गळतीच्या कचाट्यात सापडले.



घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून या प्रकरणाचा तपास सुरु केले आहे.गॅस गळतीत गुदमरून चार जणांचा मृत्यू झाला तर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र या दुर्घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Gas leak from tanker in Surat, 4 workers killed; More than 25 people are in critical condition

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात