Gallantry Awards: न वीरगती पर रो देना ! माता जेव्हा पुत्राचे शौर्यचक्र स्वीकारते-गहिवरते-थरथरते-अनावर झालेल्या अश्रूंना मात्र आवर घालते…


  • मेरी शहादत को माँ तुम न आंसू से धो देना …मरकर भी मैं अमर हुआ न वीरगति पर रो देना !
  • भारत मातेसाठी शहीद बिलाल अहमद मागरेंची माता मुलाचे शौर्यचक्र स्वीकारताना गहिवरली, राजनाथ सिंहांनी धीर दिला.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : शहीद भगतसिंग म्हणाले होते आई तू माझ्या मृत्यूनंतर रडलीस तर लोक म्हणतील ‘ वो देखो शहीद भगतसिंग की माँ रो रही है ! ‘ न वीरगती पर रो देना असंच काहीस चित्र राष्ट्रपती भवनात पहायला मिळालं.एका शहीदाची माता देखील तितकीच शूर असते ह्याचेच हे उदाहरण…आलेल्या अश्रूंना डोळ्यांच्या कडेवरच रोखून धरत ती गहिवरली-थरथरली रडली मात्र नाही सलाम ह्या वीरमातेला …!मुलाला दिलेला शब्द तीने पाळला … Gallantry Awards: Don’t cry on Veergati! When the mother accepts the cycle of heroism of her son-deepening-trembling-she only covers the tears that have been shed …

राष्ट्रपती भवनात शूरवीर जवानांचा त्यांच्या अतुलनीय पराक्रमाबद्दल गौरव करण्यात आला. जम्मू आणि काश्मीरचे एसपीओ बिलाल अहमद मागरे यांना मरणोत्तर शौर्यचक्र प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हे शौर्यचक्र प्रदान केले गेले. बिलाल अहमद यांची आई सारा बेगम यांनी मुलाचा शौर्य चक्र पुरस्कार स्वीकारला. यावेळी सारा बेगम भावूक झाल्या आणि त्यांचा श्वास जोरजोरात सुरू झाला.ह्रदय देखील धडधडत होते .

हे पाहून आधी तिथे उपस्थित महिला कॉन्स्टेबलने त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना आधार दिला. त्यानंतर सारा बेगम पुरस्कार घेऊन परतत असताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांचे सांत्वन केले.

बिलाल अहमद मागरे हे जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथे विशेष पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत होते. २० ऑगस्ट २०१९ ला सुरक्षा दलांना बारामुल्ला येथील एका घरात दहशतवादी असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर संयुक्त वेढा घालून शोध मोहीम हाती घेण्यात आली.

यामुळे सामान्य नागरिकही घरात अडकून पडले होते. अशा परिस्थितीत बिलाल स्वेच्छेने या मोहिमेत सहभागी झाले. जिवाची पर्वा न करता ते नागरिकांना तिथून बाहेर काढत होते. यावेळी दहशतवाद्यांनी त्यांच्यावर ग्रेनेडने हल्ला केला आणि बेछुट गोळीबार केला.

दहशतवादी हल्ल्यात गंभीर जखमी होऊनही बिलाल अहमद मगरे यांनी तेथील दहशतवाद्यांशी मुकाबला केला आणि एका दहशतवाद्याला ठार केले. मात्र, अतिरक्तस्रावामुळे ते शहीद झाले.

Gallantry Awards : Don’t cry on Veergati! When the mother accepts the cycle of heroism of her son-deepening-trembling-she only covers the tears that have been shed …

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात