भाजपमध्ये बडा पॉवर शिफ्ट : संसदीय मंडळातून गडकरी, शिवराज “आऊट”; केंद्रीय निवडणूक समितीत फडणवीस “इन”!!


प्रतिनिधी

नवी दिल्ली : भाजपच्या केंद्रीय पातळीवरील सत्ता संतुलनात मोठा फेरबदल घडला असून पक्षाने नवीन संसदीय मंडळाची घोषणा केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मंडळातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे गडकरींची पार्लमेंटरी बोर्डातून एक्झिट हा सगळ्यात मोठा धक्का मानला जातो आहे. याचा अर्थ गडकरी यांचे राजकीय करियरही अस्ताच्या दिशेने निघालेले मानले जात आहे. संसदीय समिती, भाजप पक्षातील सर्वोच्च समितीची पुर्नरचना जाहीर करण्यात आली असून यामध्ये काही महत्वपूर्ण बदल पक्षाने केल्याचे समोर आले आहे. Gadkari Shivraj Out from Parliamentary Board Fadnavis in in Central Election Committee

संसदीय समितीत या 11 जणांना एन्ट्री

पक्षाच्या संसदीय समितीत कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा, आसामचे माजी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांना संधी दिली गेली आहे, तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना वगळण्यात आले आहे. संसदीय समितीत आता अध्यक्ष जे. पी. नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, राजनाथ सिंह, येडीयुरप्पा, सर्बानंद सोनोवाल, श्री के. लक्ष्मण, इक्बाल सिंह लालपुरा, सुधा यादव, सत्यनारायण जटिया, बी. एल. संतोष या 11 जणांचा समावेश असेल तर भाजपच्या या संसदीय समितीत आता महाराष्ट्रातला एकही नेता नसेल.

भाजपच्या संसदीय मंडळाची यादी

जगत प्रकाश नड्डा (अध्यक्ष), पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, बी. एस. येडियुरप्पा, सर्बानंद सोनोवाल, के. लक्ष्मण, इक्बाल सिंग लालपुरा, सुधा यादव, सत्यनारायण जाटिया, बी. एल. संतोष (सचिव)

भाजपची केंद्रीय निवडणूक समिती

जगत प्रकाश नड्डा (अध्यक्ष), पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, बी. एस. येडियुरप्पा, सर्बानंद सोनोवाल, के. लक्ष्मण, इक्बाल सिंग लालपुरा, सुधा यादव, सत्यनारायण जटिया, भूपेंद्र यादव, देवेंद्र फडणवीस, ओम माथूर, बी. एल. संतोष (सचिव), वनथी श्रीनिवास

महाराष्ट्रातून फडणवीसांना केंद्रीय निवडणूक समितीत स्थान

महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय निवडणूक समितीत स्थान देण्यात आले आहे. फडणवीसांसह अनेक माजी मुख्यमंत्र्यांना संसदीय बोर्डात समावेश होईल असे मानले जात होते. मात्र, त्याऐवजी त्यांना केंद्रीय निवडणूक समितीत स्थान देण्यात आलेय. निवडणूक विधानसभेची असो की लोकसभेची, त्यातली तिकीट वाटप अंतिम करण्याचे काम याच महत्वपूर्ण समितीत केले जाते.

 संसदीय समितीत एकाही मुख्यमंत्र्याला स्थान नाही

योगी आदित्यनाथ, देवेंद्र फडणवीस यांना भाजपच्या संसदीय समितीत स्थान मिळेल अशी चर्चा होती. पण या दोघांसह कुठल्याच मुख्यमंत्र्यांना यात स्थान दिलेले नाही. संसदीय बोर्डात एकूण 11 सदस्य आहेत. त्यापैकी केवळ एक महिला आहे. सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर या महत्वाच्या समितीत निर्मला सीतारमन किंवा स्मृती इराणी यांचा समावेश होईल असे अपेक्षित होते. परंतु, त्याऐवजी हरियाणाच्या सुधा यादव यांना संधी दिली आहे. या संघटनात्मक बदलांमधून भाजपच्या अंतर्गत रचनेत आता मोदी – शाहांचीच पकड अधिक मजबूत झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Gadkari Shivraj Out from Parliamentary Board Fadnavis in in Central Election Committee

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!