मोहित कंबोज यांची ट्विट : भाजपचे प्लॅन यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादीची “धडपड”; नेतृत्वाचा मार्ग कोणाचा होतोय मोकळा??


विनायक ढेरे

भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी काल रात्रीपासून एकापाठोपाठ एक ट्विट करून जी राजकीय खळबळ वाजवली आहे, ती मोहित कंबोज आणि भाजपच्या नेत्यांना अपेक्षितच असल्याचे दिसत आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या “बड्या बड्या” नेत्यांकडे मोहित कंबोजनी अंगुली निर्देश करून भाजपला जे साध्य करायचे आहे, ते साध्य करून घेतले आहे. एक तर विधिमंडळ अधिवेशनाचा मुहूर्त साधत मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादीचे बडे बडे नेते असे सांगून अजितदादा पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे थेट अंगुली निर्देश केला आहे. आता इतक्या “बड्या बड्या” नेत्यांकडे कारवाईचा अंगुलीनिर्देश केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर नेते भडकले नसते तरच नवल!! नेहमीप्रमाणे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांना आक्रमक आणि टोकदार वाटणाऱ्या भाषेत मोहित कंबोज यांना प्रत्युत्तर देऊन घेतले.What will be consequence if NCP leaders goes to jail in irrigation scams or others??

मोहित कंबोज हे कोंडा कोणाचा चड्डीचा नाडा आहे?, हे सगळ्यांना माहिती आहे. पण मोहित कंबोज यांच्यामुळे अशा काही कारवाया होत नाहीत आणि झाल्या तर राष्ट्रवादी त्याला घाबरत नाही, असा इशारा त्यांनी देऊन ठेवला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रीय तपास संस्थांवर जोरदार आगपाखड करून घेतली आहे. ईडी, सीबीआय या केंद्रीय तपास संस्थांच्या कारवाया व्हाव्यात आणि त्या पाठोपाठ नाना पटोले, अमोल मिटकरी यांच्यासारख्या नेत्यांच्या प्रतिक्रिया याव्यात आता “नैसर्गिक राजकीय घटनाक्रम” बनला आहे. यात काहीही विशेष नाही.


मोहित कंबोज यांनी ट्विट केलेला राष्ट्रवादीचा बडा नेता कोण??; पवार की पटेल??


– अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया

त्यातल्या त्यात विशेष प्रतिक्रिया आहे, अंजली दमानिया यांची. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर दबाव आणून भाजपने “प्लॅन बी” सुरू केला आहे, असा त्यांचा दावा आहे. एकनाथ शिंदे यांचा गट बाहेर पडण्याची अथवा परत काही वेगळा करणे विचार करण्याची भीती भाजपला वाटत असल्याने ती शक्यता कायमची दूर ठेवण्यासाठी भाजपने “प्लॅन बी” आखून राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याच्या दिशेने पाऊल टाकल्याचे मत अंजली दमानिया यांनी व्यक्त केले आहे. भाजपचा जो काही प्लॅन बी – सी – डी असेल तो फक्त अंजली दमानिया यांनाच कळला असेल असे यातून स्पष्ट होते!!

– भाजप प्लॅनच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रवादीची “धडपड”!!

पण खरंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या “बड्या बड्या” नेत्यांनी काही केलेच नसेल, ते धुतल्या तांदळासारखे स्वच्छ असतील, त्यांच्या परदेशात कुठे मालमत्ताच नसतील, सिंचन घोटाळ्यापासून ते जरंडेश्वर साखर कारखान्यापर्यंत आणि इक्बाल मिर्ची पासून ते अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या निलंबनाच्या कारवाईपर्यंत कोणत्याच प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या “बड्या बड्या”
नेत्यांचा हातच नसेल, तर ईडी, सीबीआय आणि त्यानंतर येणारी एनआयए या संस्थांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी घाबरण्याचे कारण काय?? मग एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे “बडे बडे” नेते घाबरणारच नसतील, तर भाजपने प्लॅन बी – सी – डी पासून कोणताही प्लॅन आखला तरी त्याचा “प्लॅन एफ” होणार… म्हणजे फसणार, याविषयी काय शंका??

त्यामुळे भाजपचा कोणताही “प्लॅन” असलाच तरी तो “यशस्वी” व्हावा, यासाठीच राष्ट्रवादीची गेल्या 15 – 20 वर्षापासून ची धडपड चालू नव्हती काय??, याचा शोध खरं म्हणजे अंजलीताई दमानिया यांनी घेतला पाहिजे!!

– सुप्रिया सुळेंचा मार्ग मोकळा होतोय त्याचे काय??

बाकी अमोल मिटकरी, नाना पटोले यांच्यासारख्यांच्या यांच्यासारख्यांच्या प्रतिक्रिया येणे अगदी स्वाभाविक आहे. पण मोहित कंबोज यांच्यानुसार खरंच जर राष्ट्रवादीचे “बडे बडे” नेते “बड्या” कारवायांमध्ये अडकले, तर त्या नेत्यांच्या राजकीय भवितव्याचे काय व्हायचे ते होवो… खासदार सुप्रिया सुळे या मात्र मोकळ्या राहणार असल्याने त्यांचा राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचा मार्ग मात्र या निमित्ताने “मोकळा” होतोय, हे कोणीच कसे बोलायला तयार नाही…?? हा खरा प्रश्न आहे…!!

हा आता राष्ट्रवादीचे “बडे बडे” नेते खरंच “बड्या” कारवायांमध्ये अनिल देशमुख आणि नवाब मलिकांच्या शेजारी पोहोचल्यानंतर राष्ट्रवादीची जी राजकीय प्रतिमाहानी होईल, त्या प्रतिमाहानी आणि झालेल्या राष्ट्रवादीचे नेतृत्व सुप्रिया सुळे यांच्याकडे आल्यानंतर त्या पक्षाचे राजकीय भवितव्य काय असेल??, हा भाग अलहिदा!!

What will be consequence if NCP leaders goes to jail in irrigation scams or others??

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती