मोहित कंबोज यांनी ट्विट केलेला राष्ट्रवादीचा बडा नेता कोण??; पवार की पटेल??


प्रतिनिधी

मुंबई : भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी काल रात्री उशिरा दोन ट्विट केली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात खळबळ उडाली असून मोहित कंबोज यांच्या ट्विटमध्ये उल्लेख केलेला राष्ट्रवादीचा बडा नेता कोण??, याची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरात सुरू आहे.Mohit Kamboj tweeted who is the great leader of NCP??; Pawar or Patel

मोहित कंबोज यांनी काल रात्री 9.16 वाजता सुमारास राष्ट्रवादीचा एक बडा – बडा नेता लवकरच नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्याबरोबर तुरुंगात दिसणार असे पहिले ट्विट केले आणि त्यानंतर रात्री 10.38 वाजता सिंचन घोटाळ्याचा तपास पुन्हा सुरू झाला पाहिजे. तो 2019 मध्ये परमवीर सिंग यांनी बंद केला होता, अशा आशयाचे ट्विट केले आहे.



या दोन्ही ट्विट मुळे राष्ट्रवादीचे बडे नेते नेमके कोण?, हा प्रश्न तयार झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने दोन नावे समोर आली आहेत. एक प्रफुल्ल पटेल आणि दुसरे अजित पवार यांचे. अजित पवार यांचा संबंध थेट सिंचन घोटाळ्याशी आहे. त्यांच्याविरुद्ध हायकोर्टात केस देखील चालू होती. परंतु, परमवीर सिंग यांनी फडणवीस – पवार सरकारच्या 5 दिवसांच्या काळात ही केस बंद केली होती. मोहित कंबोज यांनीही केस पुन्हा ओपन करण्याची मागणी केली आहे.

इक्बाल मिर्ची – प्रफुल्ल पटेल कनेक्शन

परंतु राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांमध्ये फक्त अजित पवारांचा समावेश होत नसून प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रीय पातळीवरचे पवारानंतर शरद पवारांनंतरचे बडे नेते आहेत. दाऊद गँगचा म्होरक्या इक्बाल मिर्शीची संबंधित मुंबईतील नरिमन पॉईंट येथील सी. जे. हाऊस हे प्रफुल्ल पटेल यांचे चार मजल्यांचे निवासस्थान ईडीने आधीच जप्त केले आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्यांच्याविरुद्ध आधीच सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने केस दाखल केली आहे.

– भारतीय फुटबॉल महासंघ

प्रफुल्ल पटेल यांच्याविरुद्ध कायदेशीर केसेस आहेतच, पण याखेरीज कालच एक महत्त्वाची घटना घडली आहे ती म्हणजे, ज्या अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे ते अध्यक्ष होते त्यांच्याच एका पत्रामुळे जागतिक फुटबॉल महासंघटनेने भारतीय फुटबॉल महासंघावर निलंबनाची कारवाई केली आहे. भारतात होणारी जागतिक महिला फुटबॉल स्पर्धा रद्द केली आहे. प्रफुल्ल पटेल यांना सुप्रीम कोर्टाने अध्यक्षपदावर कायम राहण्याची मनाई केली होती. त्याच्या बदल्यात प्रफुल्ल पटेल यांनी जागतिक फुटबॉल महासंघाकडे पत्र पाठवून भारतीय फुटबॉल महासंघाची पात्रताच रद्द करवून घेतली. ही फार मोठी बाब भारतीय प्रतिष्ठेला धक्का देणारी ठरली आहे. केंद्र सरकार या संदर्भात नेमकी काय ॲक्शन घेते?, हे पाहणे देखील महत्त्वाचे आहे.

Mohit Kamboj tweeted who is the great leader of NCP??; Pawar or Patel

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात