ही दोस्ती तुटायची नाय, मित्राचा जीव वाचविण्यासाठी ऑक्सिजन घेऊन १३०० किलोमीटर प्रवास

मैत्रीच्या भावनेचे अत्यंत उदात्त रुप कोरोनाच्या संकटाच्या काळातही पाहायला मिळाले आहे. एका मित्राने मित्राचा जीव वाचविण्यासाठी ऑक्सिजन घेऊन तब्बल 1300 किलोमीटर मोटारीने प्रवास केला.Friendship , he traveled 1300 km with oxygen to save his friend’s life


विशेष प्रतिनिधी 

नवी दिल्ली : मैत्रीच्या भावनेचे अत्यंत उदात्त रुप कोरोनाच्या संकटाच्या काळातही पाहायला मिळाले आहे. एका मित्राने मित्राचा जीव वाचविण्यासाठी ऑक्सिजन घेऊन तब्बल 1300 किलोमीटर मोटारीने प्रवास केला.

24 एप्रिलो रोजी रांचीच्या वैशाली गाझियाबाद येथील रहिवाशी असलेल्या संजय सक्सेना यांचा देवेंद्रकुमार यांना फोन आला. कोरोना झाल्यामुळे राजनकुमार यांना ऑक्सिजनची मोठी गरज आहे. सध्या केवळ एका दिवसाचा ऑक्सिजन शिल्लक असून पुढील ऑक्सिजन मिळेनासा झाला आहे.



माझ्या घरीच राजनवर उपचार सुरू आहेत, असे संजय यांनी सांगितले.संजय यांच्याकडून राजनच्या प्रकृतीबद्दल माहिती मिळाल्यानंतर बालपणीच्या मित्रासाठी काहीही करायची तयारी दर्शवत देवेंद्रकुमार यांनी धावपळ सुरू केली.रांचीवरुन मध्यरात्रीच 150 किलोमीटर दूरवर असलेल्या बोकारोला निघाले.

बोकारो येथे ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध झाला नाही. त्यानंतर देवेंद्र यांनी झारखंडमधील गॅस प्लँटचे मालक राकेश कुमार गुप्ता यांच्याशी संपर्क साधला. राकेश यांनी देवेंद्रसाठी एका सिलेंडरची सोय केली. आता, ऑक्सिजन सिलेंडर मिळाला पण हा सिलेंडर 1300 किमी दूर म्हणजे वैशाली गाझियाबाद येथे न्यायचा होता.

देवेंद्रकुमार यांनी एका मित्राकडे चारचाकी गाडी मागितली. त्यानंतर स्वत : गाडी चालवत तब्बल तेराशे किलोमीटरचा प्रवास केला. या प्रवासासाठी त्यांना 24 तास लागले. अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त असल्याने त्यांना ऑक्सिजन सिलेंडरबाबत विचारणाही करण्यात आली.

त्यावेळी, दोस्ताच्या जीव वाचविण्यासाठी होत असलेली धडपड देवेंद्र यांनी सांगितली. सोमवारी दुपारी देवेंद्र वैशाली गाझियाबाद येथे पोहोचले. वेळेत राजन यांना ऑक्सिजन सिलेंडर मिळाले अन् त्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

देवेंद्र आणि राजन हे दोन्ही बालपणीचे मित्र असून दोघेही बोकारो येथेच लहानाचे मोठे झाले आहेत. आपल्या महाविद्यालयीन शिक्षणानंतर देवेंद्र इंश्युरन्स आणि राजन आयटी सेक्टरमध्ये नोकरीला लागले. सध्या दोघांचेही वय 34 वर्षे एवढे आहे.

राजन सध्या आपल्या पत्नीसोबत नोएडा येथे राहतात. देवेंद्र अविवाहीत असून रांची येथे राहतात. आजही देवेंद्र बाकारो येथे राजनच्या उपचारासाठी थांबला आहे, आता मित्राला बरं करुनच आपण कामाला लागणार असल्याचे म्हणत मैत्रीचा अनोखा आदर्श त्यांनी जगासमोर ठेवला आहे.

Friendship , he traveled 1300 km with oxygen to save his friend’s life

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात