French Open 2021 Semi Final : जोकोव्हिच अंतिम फेरीत दाखल ; नदालचे फ्रेंच साम्राज्य संपुष्टात

विश्वविक्रमी २१व्या ग्रँडस्लॅम जेतेपदाच्या प्रयत्नात असलेल्या नदालच्या मोहिमेला जोकोविचने धक्का दिला.


४ तासांहून अधिक काळ रंगलेल्या सामन्यात जोकोव्हिचची सरशी. French Open 2021 Semi Final


विशेष प्रतिनिधी

पॅरिस : क्ले कोर्टचा बादशहा म्हणून ओळख असलेल्या राफेल नदालला फ्रेंच ओपन स्पर्धेत पराभवाचा धक्का बसला आहे. सर्बियाच्या नोवाक जोकोव्हिचने नदालची झुंज मोडून काढत अंतिम फेरीत प्रवेश केलाय. तब्बल ४ तासांहून अधिक काळ रंगलेल्या सामन्यात जोकोव्हिचने पिछाडी भरुन काढत नदालची झुंज ३-६, ६-३, ७-६(४), ६-२ अशी मोडून काढली.

फ्रेंच ओपन ही स्पर्धा नदालसाठी सोपी मानली जाते. आतापर्यंत या स्पर्धेचं नदालने १३ वेळा विजेतेपद पटकावलं आहे. दरम्यान या विजयासह फ्रेंच ओपन स्पर्धेत नदालला दोनवेळा पराभवाचा धक्का देणारा पहिला खेळाडू ठरला आहे. २०१६ साली जोकोव्हिचने या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं.

पहिला सेट जिंकत या सामन्यात नदालने चांगली सुरुवात केली होती. परंतू यानंतर जोकोव्हिचने दुसरा सेट जिंकत आपण हा सामना सहजासहजी बहाल करणार नाही हे सांगितलं. तिसऱ्या सेटमध्ये या दोघांमधली झुंज उत्कंठावर्धक होती, परंतू इथेही जोकोव्हीचने संयम दाखवत सेट आपल्या नावे केला. यादरम्यान दोन्ही खेळाडू चांगलेच दमलेले दिसत होते. परंतू ४ तासांच्या मेहनतीवर पाणी न फिरवता जोकोव्हिचने शेवटपर्यंत झुंज देत नदालला पराभवाचा धक्का देत अंतिम फेरीत धडक दिली.

 

फ्रेंच ओपन स्पर्धेत सलामीचा सेट जिंकल्यानंतर सामना गमावण्याची नदालची ही पहिलीच वेळ ठरली. अंतिम फेरीत जोकोव्हिचसमोर स्टेफानोस त्सित्सिपासचं आव्हान असणार आहे. त्यामुळे या सामन्यात कोण बाजी मारतं याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

French Open 2021 Semi Final

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात