वृत्तसंस्था
इस्लामाबाद : पाकिस्तानात सुरू असलेल्या राजकीय गोंधळादरम्यान लंडनमध्ये राहणारे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यावर कथित हल्ला करण्यात आला आहे. पाकिस्तानचे विद्यमान पंतप्रधान इम्रान खान यांचा पक्ष असलेल्या पाकिस्तान तेहरीक इन्साफ (पीटीआय) च्या कार्यकर्त्याने हा हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. पाकिस्तानमध्ये नवाझ शरीफ यांची मुलगी मरियम नवाज यांनी याचा निषेध केला. तसेच इम्रान खान यांना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे. Former Pakistani Prime Minister Nawaz Sharif attacked in London; Suspicion on Imran Khan’s supporters
पाकिस्तानच्या संसदेत रविवारी इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावावर मतदान होणार आहे. पाकिस्तानी पत्रकार अहमद नुरानी यांनी नवाझ शरीफ यांच्यावरील हल्ल्याची माहिती दिली. या हल्ल्यात नवाज शरीफ यांचा एक अंगरक्षक जखमी झाल्याचे सांगण्यात आले. फॅक्ट फोकस नावाच्या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी काम करणाऱ्या नुरानी यांनी ट्विट करून म्हटले की, ‘पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यावर लंडनमध्ये एका पीटीआय कार्यकर्त्याने हल्ला केला आहे. पाकिस्तानात पीटीआयवर कारवाई झाली पाहिजे कारण आता पक्षाने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. शारीरिक हिंसा माफ केली जाऊ शकत नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App