राष्ट्रीय शेअर बाजाराच्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण यांना सीबीआयकडून अटक

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (एनएसए) माजी सीईओ आणि एमडी चित्रा रामकृष्ण यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दिल्लीतून अटक केली आहे. न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. या प्रकरणी सीबीआयने आनंद सुब्रमण्यमला यापूर्वीच अटक केली आहे.Former National Stock Exchange CEO Chitra Ramakrishna arrested by CBI

हिमालयात राहणाºया एका अज्ञात योग्याला एनएसईशी संबंधित गोपनीय माहिती पुरवल्याबाबत चित्रा रामकृष्ण यांना चौकशीला सामोरे जावे लागले आहे. या प्रकरणात चित्रा यांची सीबीआयने मुंबईत चौकशी केली आहे.या प्रकरणी सेबीच्या नुकत्याच आलेल्या चौकशी अहवालानंतर सीबीआयने ही कारवाई केली आहे.



हिमालयात राहणाºया एका अज्ञात योग्याला एनएसईशी संबंधित गोपनीय माहिती शेअर केल्याप्रकरणी चित्रा रामकृष्ण यांची चौकशी करण्यात आली. आयकर विभागाने यापूर्वी मुंबई आणि चेन्नई येथील चित्रा रामकृष्ण यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापेही टाकले होते. या प्रकरणी, सीबीआय यापूर्वीच चित्रा यांचे कथित सल्लागार आणि ठरएचे माजी ग्रुप आॅपरेटिंग आॅफिसर आनंद सुब्रमण्यम यांना अटक केली आहे.

सीबीआयच्या म्हणण्यानुसार एनएसईमध्ये सन २०१० ते २०१५ या पाच वर्षांच्या कालावधीदरम्यान कथित अनियमितता आढळून आली होती. रवी नारायण हे मार्च २०१३ पर्यंत ठरए चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होते. त्या काळात चित्रा कंपनीच्या डेप्युटी सीईओ होत्या. चित्रा यांनी एप्रिल २०१६ मध्ये रवी नारायण यांची जागा घेतलीआणि डिसेंबर २०१६ पर्यंत त्या पदावर काम करत होत्या.

सीबीआयने अटक केलेल्या चित्रा रामकृष्ण या एप्रिल २०१३ ते डिसेंबर २०१६ या काळात राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (एनएसई) व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. या काळात त्यांनी शेअर बाजाराशी संबंधित गोपनीय माहिती हिमालयातील एका योग्याला पुरवली असा गंभीर स्वरुपाचा आरोप सेबीने चित्रा यांच्यावर केला आहे.

चित्रा रामकृष्ण यांनी हिमालयातील अज्ञात योग्याच्या इशाऱ्याने निर्णय घेतला असा संशयही. त्याच अज्ञात योग्याच्या म्हणण्यानुसार त्यांनी काही निर्णय घेतल्याचाही त्यांच्यावर ठपका आहे.चित्रा यांनी या अज्ञात योग्याला शेअर बाजाराशी संबंधित संवेदनशील माहिती पुरवली असाही त्यांच्यावर गंभीर आरोप आहे.

या प्रकरणी चित्रा यांची तब्बल सहा वर्ष चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर नुकताच सेबीने १९० पानी निकाल दिला आहे. त्यात चित्रा रामकृष्ण यांना दोषी पकडण्यात आले. दरम्यान चित्रा रामकृष्ण यांना ३ कोटी रुपयांचा तर आनंद सुब्रमण्यम यांना २ कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे.

Former National Stock Exchange CEO Chitra Ramakrishna arrested by CBI

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात