ट्विटरचे माजी एमडी मनीष माहेश्वकरी अडचणीत, न्यायालयाने बजावली नोटीस


वृत्तसंस्था

नवी दिल्ली – धार्मिक आणि अत्यंत संवेदनशील असे व्हिडिओ समाजमाध्यमांत व्हायरल झाल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ट्विटर इंडियाचे माजी व्यवस्थापकीय संचालक मनीष माहेश्वणरी यांना नोटीस बजावली आहे.Former MD of Twitter gets in troble

ट्विटरने यंदा ऑगस्ट महिन्यातच माहेश्व री यांची अमेरिकेला बदली केली होती. या खटल्यावर आणखी सुनावणी होणे आम्हाला गरजेचे वाटते त्यामुळे आम्ही नोटीस बजावत आहोत असे न्या. सूर्यकांत आणि न्या. हिमा कोहली यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने म्हटले आहे.



याबाबत उत्तरप्रदेश सरकारने माहेश्वहरी यांना नियमितपणे खटल्याच्या सुनावणीस उपस्थित राहण्याचे निर्देश दिले होते, तशी नोटीस देखील त्यांना पाठविण्यात आली होती. कर्नाटक उच्च न्यायालयाने मात्र ती नोटीसच रद्दबातल ठरविली होती.

सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने यूपी सरकारची बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि त्यानंतर माहेश्वकरी यांना नोटीस बजावली होती.

यूपी सरकारने गाझियाबादच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या माध्यमातून एक याचिका सादर केली होती त्यात याप्रकरणी ताबडतोब सुनावणी घेणे गरजेचे असल्याचे म्हटले होते. याबाबत कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांनाही आक्षेप घेण्यात आला होता. यूपी सरकारने बजावलेल्या समन्समध्ये कर्नाटक उच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला होता.

Former MD of Twitter gets in troble

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात