माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांना गोवा सरकारचा कायमस्वरूपी कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा!!

प्रतिनिधी

पणजी : गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी लोकप्रतिनिधी म्हणून 50 वर्षे पूर्ण केली त्याबद्दल गोवा सरकारने त्यांचा अनोखा सन्मान केला आहे. प्रतापसिंह राणे यांना कायमस्वरूपी कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा बहाल करण्याचा निर्णय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळाने घेतला आहे.Former Chief Minister Pratap Singh Rane has been given the status of permanent cabinet minister of Goa government !!

डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या फेसबुक अकाउंट वरून ही माहिती दिली आहे. प्रतापसिंग राणे हे गोव्याच्या जनतेसाठी कायमच स्फूर्तीस्थान राहिले आहेत. त्यांनी गोवा विधानसभेत 50 वर्षे आमदार म्हणून काम केले आहे.



माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे माजी सभापती या भूमिकांमध्ये त्यांची कामगिरी उत्तम राहिली आहे. त्यांचा सन्मान करण्यासाठी गोवा सरकारने त्यांना कायमस्वरूपी कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा बहाल करण्याचे ठरविले आहे, असे डॉक्टर सावंत यांनी फेसबुक पोस्ट मध्ये स्पष्ट केले आहे.

प्रतापसिंग राणे यांचे चिरंजीव विश्‍वजित राणे हे सध्या गोवा भाजपचे नेते आहेत. त्यांनी निवडणूक लढविण्याची घोषणा केल्यानंतर प्रतापसिंग राणे यांनी त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. परंतु एकाच दिवसात त्यांनी ही घोषणा मागे घेतली.

या मुद्द्यावरून गोवा काँग्रेस मध्ये तसेच गोव्याच्या एकूण राज्यात राजकारणात बरीच खळबळ उडाली होती. आता मात्र प्रतापसिंग राणे यांना डॉ. प्रमोद सावंत यांच्या भाजपा सरकारने कायमस्वरूपी कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा बहाल करून त्यांना राजकीय दृष्ट्या आपल्या बाजूने वळवून घेतल्याचे दिसत आहे. गोवा विधानसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉ. प्रमोद सावंत यांनी ही चलाख राजकीय चाल खेळली आहे.

Former Chief Minister Pratap Singh Rane has been given the status of permanent cabinet minister of Goa government !!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात