माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह यांच्या माणुसकीची खिल्ली उडविण्याचा निर्लज्ज प्रकार


देशाचे माजी लष्करप्रमुख आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी एका कोरोनाबाधिताला रुग्णालयात बेड मिळत नसल्याने माणुसकीच्या भावनेतून ट्विट केले होते. मात्र, त्याची निर्लज्जपणे खिल्ली उडविण्याचा प्रकार घडला. सिंह यांनी आणखी एक ट्वीट करत ट्रोल करणाऱ्यांना सुनावले आहे.Former Army Chief and minister V. K. Sinh trolled


विशेष प्रतिनिधी 

नवी दिल्ली: देशाचे माजी लष्करप्रमुख आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी एका कोरोनाबाधिताला रुग्णालयात बेड मिळत नसल्याने माणुसकीच्या भावनेतून ट्विट केले होते. मात्र, त्याची निर्लज्जपणे खिल्ली उडविण्याचा प्रकार घडला. सिंह यांनी आणखी एक ट्वीट करत ट्रोल करणाऱ्यांना सुनावले आहे.

व्ही. के. सिंह यांनी ट्विट करून म्हटले आहेकी, कृपया मदत, करा माझ्या भावाला करोनावरील उपचारासाठी बेड मिळत नाही. गाझियाबादमध्ये कुठलीही व्यवस्था होत नाही. त्यांनी गाझियाबादच्या जिल्ह्याधिकाऱ्यांना ट्वीटमध्ये टॅग केलं.



हे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल झालं. तसंच ट्वीटवरून व्ही. के. सिंह यांना ट्रोल करण्यात आलं. आपल्या ट्वीटवरून मोठा वाद निर्माण होत असल्याचे पाहून व्ही. के. सिंह यांनी आणखी एक ट्वीट केलं आणि त्यातून टीका करणाऱ्यांना उत्तर दिले.

व्ही. के. सिंह यांनी म्हटले आहे की, आपल्या ट्वीटवरून मोठा वाद निर्माण केला गेला. पण यावरून सर्वांची बौद्धीक पातळी उघड झाल्याने चकीत झालो. आपण दुसऱ्या कुणाचे तरी ट्विट हे गाझियाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना उद्देशून फॉरवर्ड केलं होते. त्यांनी या प्रकरणाची दखल घ्यावी, असं आपण आवाहन केलं.

आपण यासाठी केलेलं ट्वीट हे हिंदीत होतं. यूपीचे मुख्यमंत्री कार्यालय आणि गाझियाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बेडची व्यवस्था करून दिली आहे. संबंधित व्यक्तीची प्रकृती आता स्थिर आहे. काहींनी जो काही गैरसमज केला आहे, तो आता दूर होईल.

विशेष म्हणजे हे सिंह यांनी केलेले ट्विट हे त्यांच्या भावासाठी नव्हते तर एका नागरिकासाठी होते. या नागरिकाला मदत मिळावी म्हणून त्यांनी ट्विट केले. परंतु, त्यावरून त्यांना ट्रोल करण्यात आले.

Former Army Chief and minister V. K. Sinh trolled

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात