गूगलमधील नोकरी सोडून आप नादी लागून दंगलखोर, माजी नगरसेवक निशा सिंगला सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा


अभियांत्रिकीची पदवी, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये एमबीए आणि सिमेन्स, गुगलसारख्या कंपन्यातील नोकरी सोडून आपमध्ये सामील झालेल्या निशा सिंग यांना दंगल भडकावल्याप्रकरणी न्यायालयाने सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. एकेकाळी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या सल्लागार असलेल्या निशा सिंग यांचे प्रोफाईल आम आदमी पक्षाने आपल्या वेबसाईटवरून हटवून त्यांना वाऱ्यावर सोडले आहे. Former Aap corporator Nisha Singh sentenced to seven years in prison


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : अभियांत्रिकीची पदवी, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये एमबीए आणि सिमेन्स, गुगलसारख्या कंपन्यातील नोकरी सोडून आपमध्ये सामील झालेल्या निशा सिंग यांना दंगल भडकावल्याप्रकरणी न्यायालयाने सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. एकेकाळी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या सल्लागार असलेल्या निशा सिंग यांचे प्रोफाईल आम आदमी पक्षाने आपल्या वेबसाईटवरून हटवून त्यांना वाऱ्यावर सोडले आहे.

2015 मध्ये गुडगाव येथे अतिक्रमण विरोधी अतिक्रमण मोहिमेविरुद्ध हिंसाचार भडकल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. 15 मे 2015 रोजी, हरियाणा नागरी विकास प्राधिकरणाचे एक अतिक्रमण विरोधी पथक गुडगावमधील सेक्टर 47 येथील झिमर बस्ती येथे अतिक्रमण हटविण्यासाठी गेले होते. यावेळी आपच्या माजी नगरसेवक निशा सिंग, वकील खजान सिंग आणि प्रदीप झैलदार यांनी जमावाला अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यासाठी भडकावले. जमावाने पोलिसांच्या पथकांवर पेट्रोल बॉम्ब आणि एलपीजी सिलिंडरही फेकल्याचा आरोप आहे. या घटनेत एक कर्तव्यदंडाधिकारी आणि अन्य १५ पोलीस कर्मचारी जखमी झाले.

निशा सिंग यांनी चांगले करीअर सोडून राजकारणात प्रवेश केला. मुंबई विद्यापीठातून अभियांत्रिकी पदवीधर असलेल्या निशा सिंगने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (2003-2005) मधून फायनान्समध्ये एमबीए केले. सीमेन्स आणि नंतर गुगलमध्ये काम करून कॉपोर्रेट जगात प्रवेश केला. गुगलमधील प्रतिष्ठित कॉपोर्रेट नोकरी सोडून राजकारणात प्रवेश केला. 2011 मध्ये त्या आम आदमी पार्टीमध्ये सामील झाली आणि 2016 मध्ये दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या सल्लागार म्हणून नियुक्त झाली.

सार्वजनिक अधिका‍ऱ्यांना दुखापत करणे ही आरोपींची गंभीर चूक आहे यात शंका नाही. त्यांचे सुधारणे किंवा पुनर्वसन करणे शक्य नाही आणि ते हिंसाचाराचे गुन्हेगारी कृत्य चालू ठेवण्याची शक्यता आहे असे मानण्याचे कारण नाही. हा समाजासाठी सततचा धोका आहे,असे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश मोना सिंग यांच्या न्यायालयाने म्हटले आहे. हुडा अतिक्रमण विरोधी पथकाविरुद्ध जमाव भडकवल्याबद्दल दोषी ठरवले.

सिंग यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यावर आपच्या वतीने त्यांना राजकीय सूडबुद्धीचा बळी म्हणून रंगविण्यात आले होते. त्यांच्या सुटकेसाठी मोहीमाही चालविल्या होत्या.

Former Aap corporator Nisha Singh sentenced to seven years in prison

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात