AAP : केजरीवालांच्या पक्षाचा हिमाचल प्रदेश सोशल मीडिया प्रमुख खलिस्तानचा समर्थक!!


प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंजाब मध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने सत्ता सांभाळतात खलिस्तानी फॉर्सेस डोके वर काढतील, ही शक्यता आधीच वर्तवण्यात येत होती. ती आता खरी होताना दिसते आहे. किंबहुना खलिस्तानची समर्थक आता पंजाबच्या पलिकडे देखील डोके वर काढू लागले आहेत. Kejriwal’s party’s Himachal Pradesh social media chief Khalistan’s supporter

आम आदमी पार्टीने ज्याला हिमाचल प्रदेश आम आदमी पार्टीचा सोशल मीडिया प्रमुख बनवला आहे, तो हरप्रीत सिंग बेदी हा खलिस्तानचा गेल्या 10 वर्षांपासून समर्थक असल्याचे उघड झाले आहे.

गेल्या 10 वर्षातली त्याची ट्विटर हँडल वरली वेगवेगळी ट्विट्स पाहिली तर ही बाब अधिक अधोरेखित होते. हरप्रीत सिंग बेदीने 2012 मध्येच जथेदार भाई बलवंत सिंग राजोना यांनी खलिस्तानची ज्योत पुन्हा एकदा पेटवली आहे. त्याचे समर्थन केले पाहिजे, असे ट्विट केले होते. त्यानंतर वेळोवेळी त्याने खालिस्तानी समर्थनाची वेगवेगळी ट्विट केली आहेत. यामध्ये त्याने खलिस्तानी डॉलर मानचित्र ट्विट केले आहेच, त्याचबरोबर खलिस्तानची मागणी करणे घटनात्मक दृष्ट्या योग्यच आहे, असाही अजब दावा केला आहे.

पंजाब मध्ये आम आदमी पार्टीचे नेते भगवंत मान यांनी शपथ घेतलेल्याला दोनच महिने उलटल्यानंतर पतियाळात खलिस्तानी समर्थकांनी आक्रमक होत धुडगूस घातला आणि त्यांनी भगवती दुर्गा यांच्या नावाने देखील अश्लील भाषेत शेरेबाजी केली. त्यावर अरविंद केजरीवाल आणि त्यांचा पक्ष मूग गिळून गप्प बसले आहेत. पतियाळात काही लोकांना अटक केली आहे. परंतु खलिस्तानी फोर्सेस पुन्हा डोके वर काढत असल्याचे यात गांभीर्य दिसत नाही आणि आता तर आम आदमी पार्टीने ज्याला हिमाचल प्रदेशात सोशल मीडिया प्रमुख नेमले आहे, तो हरप्रीत सिंग बेदी हाच खलिस्तानचा गेल्या 10 वर्षांपूर्वीचा पासूनचा समर्थक असल्याचे उघड झाले आहे.

Kejriwal’s party’s Himachal Pradesh social media chief Khalistan’s supporter

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात