परदेशात जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी, कर्मचारी किंवा खेळाडूंना आता आपल्या पासपोर्टसोबत लस प्रमाणपत्र (व्हॅक्सीन सर्टिफिकेट) लिंक करावे लागणार आहे. यासाठी त्यांच्यासाठी लसीच्या दोन डोसमधील अंतर २८ दिवस करण्यात आले आहे.For travel abroad, the vaccine certificate will now have to be linked to the passport
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : परदेशात जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी, कर्मचारी किंवा खेळाडूंना आता आपल्या पासपोर्टसोबत लस प्रमाणपत्र (व्हॅक्सीन सर्टिफिकेट) लिंक करावे लागणार आहे. यासाठी त्यांच्यासाठी लसीच्या दोन डोसमधील अंतर २८ दिवस करण्यात आले आहे.
कोविड १९ लसीकरणासाठी केंद्र सरकारने जारी केलेल्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार, परदेशात जाणारे विद्यार्थी, नोकरदार तसेच टोकियो ऑलिम्पिकसाठी जाणारे खेळाडू यांना त्यांचे कोविन व्हॅक्सीनेशन सर्टिफिकेट पासपोर्टला जोडावा लागणार आहे.
त्यामुळे २८ दिवसांच्या अंतराने त्यांना लसीचा दुसरा डोस मिळणे शक्य होणार आहे. यासाठी कोविन अॅपच्या यंत्रणेमध्ये बदल केले जाणार असल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्य सरकारांना सूचना दिल्या आहेत की लसीकरणात परदेश प्रवासाला जाणाºयांना प्राधान्य द्यावे. आंतरराष्ट्रीय प्रवास करू इच्छिणाऱ्या कोणी कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतला असेल तर दुसरा डोसही २८ दिवसांनी मिळू शकणार आहे.
सध्या कोविशिल्डचा दुसरा डोस ८४ दिवसांच्या अंतराने मिळतो. राज्य सरकारांनी याबाबतची माहिती सार्वजनिक करावी, असेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
दरम्यान, अमेरिकेतील विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना जागतिक आरोग्य संघटनेने मंजूर केलेल्या लसीचे डोसच घेणे बंधनकारक केले आहे. मात्र, नियमामुळे भारतात विकसित झालेल्या कोवॅक्सिन आणि रशियाने विकसित केलेले स्पुतनिक-व्ही अद्याप मंजूर केलेली नाही.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App