नवी उपचार पद्धती : चेस्ट फिजिओथेरपी कोरोनाग्रस्तांना वरदान , जयपूरच्या डॉक्टरांचा दावा ; ऑक्सिजन पातळी होते नॉर्मल, कफही पडतो शरीराबाहेर


वृत्तसंस्था

जयपूर : कोरोनाला रोखण्यासाठी आणि रुग्ण वाचविण्यासाठी नवे उपाय शोधले जात आहेत. त्यात आता चेस्ट फिजिओथेरपीचा समावेश झाला आहे. ही थेरपी रुग्णासाठी वरदान आहे.  For Coronavirus patient Chest physiotherapy Is Useful

राजस्थानच्या जयपूरमधील डॉक्टरांनी चेस्ट फिजिओथेरपी ही नवी उपचार पद्धती सुरु केली आहे. या थेरपीतून 15-20 दिवसांत 100 हून अधिक रुग्णांवर उपचार केले. त्याचे फार चांगले निकाल मिळाल्याचा दावा जयपूरच्या री-लाइफ हॉस्पिटलचे फिजिओथेरपिस्ट डॉ. अवतार डोई यांनी केला.अनेकांची ऑक्सिजन पातळी आणि फुप्फुसांची रिकव्हरीही वेगाने झाली जे ऑक्सिजनवर होते त्यांची ऑक्सिजन पातळी या थेरपीमुळे सामान्य झाली आहे. काही दिवसांपूर्वी ऑक्सिजन पातळी वाढविण्यासाठी रुग्णाला पोटावर झोपवले जात होते. त्याचप्रमाणे चेस्ट फिजिओथेरपीतूनही रुग्णाची ऑक्सिजन लेव्हल वाढवून ती संतुलित ठेवली जाऊ शकते, असा डॉक्टरांचा दावा आहे.

दृष्टिक्षेपात उपचार पद्धती

1 )प्रथम रुग्णाच्या फुप्फुसातून कफ काढून टाकणे आवश्यक असते. त्यामुळे फुफ्फुस चांगले कार्य करू शकेल आणि रुग्ण श्वास घेईल.

2 )फुप्फुसातील घट्ट कफ सैल करण्यासाठी डॉक्टर औषधे देतात ज्याला वेळ लागतो. याउलट चेस्ट थेरपीमध्ये औषधांशिवाय कफ सैल पडतो आणि आपोआप शरीरातून बाहेर येतो.

For Coronavirus patient Chest physiotherapy Is Useful

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण