महागाईला केंद्राचा लगाम : गहू, साखर निर्यात बंदी पाठोपाठ आता बिगर बासमती तांदूळ निर्यातीवर बंदी!!


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशातील वाढत्या महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करत आहेत. पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केल्यानंतर केंद्र सरकारने गहू आणि साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली. त्यानंतर आता केंद्र सरकार तांदळाच्या निर्यातीवर बंदी आणण्याच्या विचारात असल्याची माहिती मिळत आहे. Following the ban on export of wheat and sugar, non-basmati rice has been banned

देशातील घरगुती वापरासाठी लागणा-या वस्तूंचे दर हे गगनाला भिडले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारकडून मोठे निर्णय घेण्यात येत आहेत. देशातील जनतेसाठी लागणा-या खाद्य वस्तूंचा आवश्यक साठा नसल्याने केंद्र सरकार खाद्य वस्तूंच्या निर्यातीवर बंदी घालत आहे.

– 5 वस्तूंवर निर्यातबंदी

त्यामुळेच आता केंद्र सरकारकडून तांदळाच्या निर्यातीवर बंदी आणण्याचा विचार होत आहे. केंद्र सरकारने पाच महत्वाच्या वस्तूंच्या निर्यातीवर बंदी आणण्याचे ठरवले आहे. त्यापैकी गहू आणि साखर यांच्यावर बंदी घातली असून, आता तांदूळ आणि इतर खाद्य वस्तूंवर निर्यातबंदी आणण्याच्या विचारात केंद्र सरकार आहे.

– महागाई नियंत्रणासाठी प्रयत्न

बासमती तांदूळ वगळता इतर तांदळांच्या निर्यातीवर बंदी घालण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खाद्य वस्तूंच्या वाढत्या दरांवर लक्ष ठेवणा-या समितीकडून दर नियंत्रणात आणण्यासाठी विचारविनिमय सुरू आहे. त्यातूनच तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय होऊ शकतो, असं सांगण्यात येत आहे.

– तांदळाचा मोठा निर्यातदार भारत

जगातील तांदूळ निर्यातीत भारताचा चीननंतर दुसरा क्रमांक लागतो. भारताने 2021-22 मध्ये तब्बल 150 पेक्षा जास्त देशांना तांदूळ निर्यात केला आहे. यामध्ये भारताने विना बासमती तांदूळ निर्यातीतून सर्वाधिक परकीय चलन कमावले आहे. पण परकीय चलनापेक्षाही देशातील जनतेच्या गरजा पूर्ण करण्याकडे केंद्र सरकार लक्ष देत आहे.

Following the ban on export of wheat and sugar, non-basmati rice has been banned

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती