हेलिकॉप्टर अपघातातातील अन्य पाच मृतेदहांची ओळख पटली

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – तमिळनाडूतील कुन्नूर येथे झालेल्या भीषण हेलिकॉप्टर अपघातात मरण पावलेल्या आणखी पाच सुरक्षा अधिकाऱ्यांची ओळख पटली. या सर्वांचे पार्थिव त्यांच्या घरी पोचविण्यात आल्याचे लष्कराच्या सूत्रांनी सांगितले.Five other bodies were identified in the helicopter crash

ज्युनिअर वॉरंट ऑफिसर प्रदीप, विंग कमांडर पी.एस.चौहान, ज्युनिअर वॉरंट ऑफिसर राणाप्रताप दास, लान्स नायक बी. साई तेजा आणि लान्सनायक विवेककुमार यांच्या मृतदेहांची ओळख पटविण्यात यश आले आहे. या सर्वांचे पार्थिव विमानाने त्यांच्या घरी पाठविण्यात आले.



त्यांच्यावर मूळगावीच लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. ज्यांची ओळख पटू शकलेली नाही त्या सर्वांचे मृतदेह दिल्ली कॅटोन्मेंटमधील शवागारात ठेवण्यात आले आहेत.

ले. कर्नल हरजिंदरसिंग, स्क्वाड्रन लिडर के. सिंग, हवालदार सतपाल, नायक गुरसेवक सिंग आणि नायक जितेंदरकुमार यांच्या मृतदेहांची ओळख पटणे बाकी आहे. स्क्वाड्रन लिडर कुलदीपसिंग यांच्या पार्थिवावर झुनझुनू येथेतर ज्युनिअर वॉरंट ऑफिसर राणाप्रताप दास यांच्यावर भुवनेश्वरमध्ये लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Five other bodies were identified in the helicopter crash

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात