काश्मीरमध्ये आणखी पाच दहशतवाद्यांचा खात्मा ; चकमकीमध्ये १२ दहशतवादी ठार

वृत्तसंस्था

श्रीनगर : जम्मू-कश्मीरात सुरक्षा दलांनी सलग तिसऱ्या दिवशी दहशतद्याविरुद्ध जोरदार कारवाई केली. त्यात शोपियाँ जिह्यातील हादीपुरा परिसरात शनिवारी रात्री आणखी 5 दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यामुळे गेल्या 72 तासांत चकमकीत ठार केलेल्या दहशतवाद्यांची संख्या 12 झाली. Five more terrorists killed in Kashmir; 12 terrorists killed in clashesशुक्रवारपासून रविवारपर्यंत चार ठिकाणी जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. त्राल आणि शोपियाँमध्ये सात दहशतवाद्यांना ठार केले. यात ‘अन्सार घझवात्हुल हिंद’ या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या इम्तियाझ अहमद शाहचा समावेश आहे. तसेच हादीपुरामध्ये अल बद्रच्या तीन तर बिजबेहारामध्ये लश्कर-ए-तोएबाच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. जम्मू-कश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी ही माहिती दिली.

Five more terrorists killed in Kashmir; 12 terrorists killed in clashes