रामायण सर्किटची पहिली रेल्वे गाडी सफदरजंग स्थानकावरून आज रवाना; घडविणार येणार राम तीर्थस्थळांची सफर!!


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : केंद्र सरकारची अभिनव परिकल्पना रामायण सर्किटची पहिली रेल्वे गाडी आज दिल्लीतील सफदरजंग स्थानकावरून रवाना झाली. 17 दिवसांच्या रामायण सर्किटच्या सफरीत देशभरातील रामाशी संबंधित तीर्थस्थळे यांचे भाविकांना या यात्रेतून दर्शन घडविण्यात येणार आहे. First train departure on the ‘Ramayana Circuit’ will commence from Delhi’s Safdarjung railway station today.

आजची ही पहिली गाडी आहे. देशातील रामायणाशी संबंधित अन्य शहरांमधून देखील वेगवेगळ्या टाईम टेबल नुसार रामायण सर्किटच्या गाड्या सुटणार आहेत. अयोध्या, सीतामढी, नाशिक, रामेश्वरम तीर्थस्थळांची यात्रा या गाडी द्वारे भाविकांना घडविण्यात येणार आहे.

संपूर्ण एसी व्यवस्था असलेली ही गाडी असून भाविकांच्या सोयीसाठी फर्स्ट क्लास आणि सेकंड क्लास एसीची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर गाडीमध्ये अत्याधुनिक किचन व्यवस्था असून वैद्यकीय सुविधा देखील देण्यात आली आहे.

या निमित्ताने रामायणाशी संबंधित सर्व स्थळे रेल्वे मार्गाने जोडण्याची केंद्रातील मोदी सरकारची महत्त्वाकांक्षी योजना साकार होताना दिसते आहे. अशाच गाड्या मदुराई, नाशिक अयोध्या या स्थानकांवरूनही नियोजित टाईम टेबल नुसार सुटतील, असे भारतीय रेल्वेच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे.

First train departure on the ‘Ramayana Circuit’ will commence from Delhi’s Safdarjung railway station today

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात