विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्लीमध्ये देशातील पहिली ऑक्सिजन कॉन्सट्रेटर बँक कार्यरत झाली आहे. यासाठी १०३१ या टोल फ्री क्रमांकावर दूरध्वनी करून नागरिक मदत मागू शकतात, असेही सांगण्यात आले आहे.First oxygen concentrator bank started in Delhi
गेल्या दोन दिवसांपासून मुख्यमंत्री केजरीवाल आणि राज्य सरकार येथील रुग्णसंख्या लक्षणीयरित्या कमी झाल्याचे सांगत आहे. दिल्लीला आता ठराविक कोट्याइतकाही ऑक्सिजन आवश्यक नाही,
असेही केजरीवाल यांनी म्हटले आहे. मात्र संसर्गाविरुद्धची लढाई अजून अजिबात संपलेली नाही, त्यामुळेच भविष्यात अशी परिस्थिती उद्भवली तर आपत्कालीन मदत या स्वरूपात ही ऑक्सिजन बँक कार्यरत केली आहे.
या योजनेमध्ये दिल्लीच्या त्यामध्ये प्रत्येकी २००-२०० ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स उपलब्ध असतील,अशी बँक तयार केली जात आहे.आगामी काळात दिल्लीत गृहविलीगीकरणात राहणाऱ्या एखाद्या रुग्णाला जर
ऑक्सिजनची तातडीची गरज भासली तर राज्य सरकारचे पथक दोन तासांमध्ये त्याच्या घरी ऑक्सिजन पोचवेल, या दृष्टीने कामकाजाची आखणी करण्यात आली आहे. सुरवातीला २२०० ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्सची २४ तास उपलब्धता करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App