राहुल गांधींच्या बुलढाण्याच्या सभेत वाजवले फटाके; पण कोणी?, शोध सुरू


प्रतिनिधी/वृत्तसंस्था

बुलढाणा : भारत जोडो यात्रेदरम्यान खासदार राहुल गांधी यांनी घेतलेल्या बुलढाण्याच्या सभेत त्यांचे भाषण सुरू होण्यापूर्वी आणि सुरू असताना काही अज्ञात व्यक्तींनी फटाके वाजवले आहेत. Firecrackers set off at Rahul Gandhi’s rally

राहुल गांधींची भारत जोडो यात्रेची ही सभा शेतकरी आंदोलनात प्राण गमावलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी घेतली होती. मात्र सभा सुरू असतानाच सभेच्या एका कोपऱ्यातून फटाके फोडल्याचा आवाज आला. काही शोभेचे फटाके ही यावेळी फोडले गेल्याचे दिसले. त्यानंतर राहुल गांधींचे भाषण सुरू झाल्यावरही काही फटाके फुटले.

त्यामुळे राहुल गांधींना भाषण थांबवावे लागले. शेतकरी आंदोलनात प्राण गमावलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली मानेच्या सभेत नेमके कोणी फटाके फोडले याचा शोध आता घेतला जात आहे.

काही असामाजिक तत्त्वांनी सभेत फटाके वाजवल्याचे एएनआय या वृत्तसंस्थेच्या बातमीत नमूद केले आहे.

Firecrackers set off at Rahul Gandhi’s rally

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण