वृत्तसंस्था
जयपूर : राजस्थानच्या जंगलात भीषण वणवा लागल्याने प्राणी जिवाच्या आकांताने गावांकडे धाव घेत असल्याने गावकरी संकटात सापडले आहे. दरम्यान आगा आटोक्यात आणण्यासाठी;लष्कराची हेलिकॉप्टर मागविली आहेत. राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील सरिस्का व्याघ्र अभयारण्यामध्ये रविवारी भीषण आग लागली. Fire at Sariska Forest in Rajasthan; animals ran towards villages
सरिस्का डोंगरात ही आग लागल्यामुळे प्राणीही त्रस्त झाले असून ते गावाकडे धाव घेत आहेत. प्रशासन सतर्क झाले आहे. पोलिसांचे पथक लोकांना घरातच राहण्याचा सल्ला देत आहे.
पृथ्वीपुरा-बालेटा गावाशेजारच्या जंगलात लागलेली ही आग पाहता पाहता कित्येक कमीपर्यंत पसरली. आग लागल्याची माहिती मिळताच सिव्हिल डिफेन्सचे अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आणि ग्रामस्थांच्या मदतीने आठ तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. परंतू पुन्हा सोमवारी दुपारी आग भडकली आणि आता ती डोंगररांगांमध्ये पसरली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App