FIFA Suspends AIFF: जागतिक फुटबॉल महासंघाने भारतीय महासंघाला केले निलंबित; नियमभंगाचा ठपका; प्रफुल्ल पटेल होते अध्यक्ष!!


वृत्तसंस्था

लंडन : भारतीय फुटबॉल चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. जागतिक पातळीवरची फुटबॉलची सर्वोच्च संस्था जागतिक फुटबॉल महासंघ अर्थात फिफाने अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे निलंबन केले आहे. हा निर्णय तात्काळ लागू होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतीय फुटबॉलमध्ये बरेच काही वेगळे सुरू होते. आता फिफाच्या या निर्णयाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मात्र अखिल भारतीय फुटबॉल महासंघात बऱ्याच अनियमितता होत्या या कारणावरून फिफाने त्यांना निलंबित केले आहे. 2009 ते 2022 या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नंबर दोनचे नेते प्रफुल्ल पटेल हे अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षपदी कार्यरत होते.FIFA Suspends AIFF: World Football Federation Suspends Indian Federation; Reprimand for violation of rules; Praful Patel was the President!! फिफाने केले निलंबित 

फुटबॉलची प्रमुख संस्था FIFA ने अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला (AIFF) त्रयस्थ पक्षांशी संगनमत करुन आणि देशातील फुटबॉल ऑपरेशन्सवर परिणाम करण्यासाठी तत्काळ प्रभावाने निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. हे निलंबन दीर्घकाळापासून सुरू होते आणि फिफाने सांगितले की एआयएफएफवर बंदी घालण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. FIDE च्या निलंबनामुळे, भारत यापुढे कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळू शकणार नाही किंवा कोणत्याही स्पर्धेत भाग घेऊ शकणार नाही.

नियमांचे उल्लंघन नोंदवले 

FIFA ने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, FIFA परिषदेच्या ब्युरोने एकमताने एक तृतीयांश बहुमताने आवाजी मताने अखिल भारतीय फुटबॉल महासंघला (AIFF) तात्काळ निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. जे फिफाच्या नियमांचे गंभीर उल्लंघन आहे. नियमांचे उल्लंघन केल्यानेच हा कठोर निर्णय घेण्यात आला आहे. वास्तविक, सर्वोच्च न्यायालयाने एआयएफएफमधील अनियमितता लक्षात घेऊन निवडणुका घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांना अध्यक्षपदावरून दूर व्हावे लागले होते त्यामुळे ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन मध्ये लवकरच निवडणूक होण्यापेक्षा होते परंतु त्यापूर्वीच फिफाने हे निलंबनाचे कठोर पाऊल उचलले आहे.

17 वर्षांखालील विश्वचषक होणार नाही 

या निलंबनामुळे यंदा भारतात होणाऱ्या अंडर-19 महिला विश्वचषकावरही अंधाराचे ढग दाटले आहेत. आता 17 वर्षांखालील विश्वचषक आयोजित केला जाणार नाही. हा विश्वचषक 11 ते 30 ऑक्टोबर दरम्यान होणार होता. परंतु आता जागतिक फुटबॉल महासंघाने भारतीय फुटबॉल महासंघ बरखास्त करून निलंबित करून टाकल्याने ही विश्वचषक स्पर्धा भारतात होणार नाही.

FIFA Suspends AIFF: World Football Federation Suspends Indian Federation; Reprimand for violation of rules; Praful Patel was the President!!

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!