महिला प्राध्यापिकेने पोस्ट केले बिकिनी फोटोज : कॉलेजने मागितला राजीनामा, 99 कोटींची मानहानीची नोटीस


वृत्तसंस्था

कोलकाता : सेंट झेवियर्स युनिव्हर्सिटी, कोलकाता येथील सहाय्यक प्राध्यापिकेने स्वत:चे काही बिकिनी फोटो आपल्या वैयक्तिक इंस्टाग्रामवर शेअर केल्यामुळे त्यांना राजीनाम्यासाठी मजबूर करण्यात येत आहे. यानंतर त्यांना कॉलेजमध्ये कांगारू कोर्टात लाजिरवाण्या आणि द्वेषाने भरलेल्या प्रश्नोत्तरांना सामोरे जावे लागले. त्यांनी तो प्रसंग अतिशय वेदनादायक असल्याचे म्हटले आहे.Female professor posts bikini photos College demands resignation, 99 crore defamation notice

काय आहे प्रकरण?

प्राध्यापिका म्हणाल्या की, कुलगुरूंनी त्यांना बोलावले आणि त्या बैठकीला बरेच लोक उपस्थित होते जे त्यांना इतके अपमानजनक प्रश्न विचारत होते, ज्यांची उत्तरे देणे फार कठीण होते. ते लोक खासगी इंस्टाग्रामवरील त्या फोटोंवर वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट करत होते. “त्या छायाचित्रांसाठी मला केवळ एक तासाहून अधिक काळ त्रास दिला गेला, शिवाय मला राजीनामा देण्यासही भाग पाडले गेले,” असा आरोप त्यांनी केला आहे.त्या म्हणाल्या की, मी विद्यापीठात प्रवेश करण्यापूर्वी ऑगस्ट 2021 मध्ये या पोस्ट केल्या होत्या आणि फक्त त्यांचे जवळचे मित्रच त्यांच्या पोस्ट पाहू शकतात. कुलगुरू फादर फेलिक्स यांनी मला विचारले की, माझ्या आईने हे फोटो पाहिले आहेत का? त्या असे फोटो स्वीकारू शकतात का? आणखी एका महिला पदाधिकाऱ्याने मला विचारले की, असे फोटोज पोस्ट करणे योग्य आहे का?

99 कोटींची मानहानीची नोटीस

सहाय्यक प्राध्यापिका म्हणाल्या की, ही बाब ऑक्टोबर 2021 ची आहे. मात्र, त्यांनी जानेवारी २०२२ मध्ये अज्ञात व्यक्तींविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यांनी यावर्षी 1 मार्च रोजी विद्यापीठाला कायदेशीर नोटीसही पाठवली होती, त्यानंतर विद्यापीठाने त्यांना 99 कोटी रुपयांची मानहानीची नोटीस पाठवली होती.

प्राध्यापिका म्हणाल्या की, सेंट झेवियर्समध्ये इंग्रजीमध्ये बीए केल्यानंतर, त्या एमएसाठी जाधवपूर विद्यापीठात गेल्या आणि नंतर डॉक्टरेटसाठी युरोपियन विद्यापीठात गेल्या. कोरोना काळात त्या नोकरीवर रुजू झाल्या होत्या.

Female professor posts bikini photos College demands resignation, 99 crore defamation notice

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था