Fastest Growing Economy : भारत कशी बनला जगातली 3 री आर्थिक ताकद??; पंतप्रधान मोदींनी केले विशद!!


आज भारत जी – 20 देशांमध्ये “फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनोमी” अर्थात सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. ही उगाच “हवेतली बात” नाही, तर दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकडेवारीनिशी याचे विवरण केले आहे. संबंधित आकडेवारी केंद्र सरकारची तर आहेच, पण त्याचबरोबर अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी ती प्रमाणित केलेली असल्यामुळे त्या आकडेवारीचे महत्त्व अधिक आहे. Fastest Growing Economy: How India Became 3rd Economic Power in the World

याचा अर्थ देशात कोणत्या समस्याच नाहीत, असा अजिबात नाही. आर्थिक पातळीवर सगळे सुजलाम-सुफलाम आहे, असेही अजिबात नाही. पण देशांतर्गत समस्या सोडविण्याची आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर समस्या सोडवण्यासाठी मोलाचे योगदान देण्याची भारताची आणि भारतीयांची क्षमता प्रचंड वाढली आहे, असाच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतिपादनाचा अर्था आहे.

 

 

  •  उदाहरणच द्यायचे झाले तर जी – 20 देशांमध्ये “स्मार्टफोन डेटा कंज्युमर इंडेक्स” मध्ये भारत आज जगात पहिल्या नंबर वर आहे.
  •  2014 मध्ये मोदी सरकारने सत्ता हाती घेतली तेव्हा देशात फक्त 300 ते 400 स्टार्ट अप होते. गेल्या 8 वर्षांच्या कालखंडातली स्टार्टअप की दुनिया भारतात पूर्ण बदलून गेली आहे. देशात आज तब्बल 70000 स्टार्टअप आहेत. भारत आज जगातला सगळ्यात मोठी स्टार्टअपची इकोसिस्टीम बनला आहे.
  •  मोबाईल गेमिंग क्षेत्रात भारत आत्तापर्यंत फक्त ग्राहकाची भूमिका बजावत होता. पण हे चित्र देखील पूर्ण बदलून गेले असून जगातल्या टॉप 5 देशांमध्ये आता भारताचा समावेश होतो आहे. भारतातल्या ही गेमिंग इंडस्ट्रीची वाढ 40 % अधिक आहे.
  •  2022 – 23 च्या केंद्रीय बजेट मध्ये अनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट आणि कॉमिक सेक्टरमध्ये आर्थिक तरतुदी करून या क्षेत्राला बळकटी देण्याचे काम केले आहे.
  •  मोबाईल उत्पादनात भारत 2 वर्षांपूर्वीपर्यंत केवळ ग्राहक म्हणूनच भूमिका बजावत होता. पण आता प्रत्यक्ष उत्पादन क्षेत्रात भारताने आघाडी घेतली आहे.
  • भारतातून पुश बटन मोबाईल फोनच्या निर्यातीत 2020 – 21च्या तुलनेमध्ये 2021 – 22 मध्ये तब्बल 621 % वाढ झाली आहे, तर याच कालावधीत भारतात तयार झालेल्या म्हणजे उत्पादित झालेल्या स्मार्टफोनच्या निर्यातीत तब्बल 28 % वाढ झाली आहे.
  •  भारताच्या आर्थिक आणि बौद्धिक क्षमतेचा हा जगाला झालेला हा नवा परिचय आहे. भारत आता जगात इतर देश निर्मिती असलेल्या वस्तूंचा फक्त ग्राहक उरलेला नाही, तर तो निर्माताही झाला आहे. म्हणजेच प्रत्यक्ष उत्पादन क्षेत्रातही आघाडीवर पोहोचला आहे, याचीच ही उदाहरणे आहेत.
  •  आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रमाणित झालेल्या आकडेवारीनिशी ती स्पष्ट केली आहे.

Fastest Growing Economy: How India Became 3rd Economic Power in the World

 

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात