वृत्तसंस्था
नवी दिल्ली : केंद्राने लागू केलेल्या शेतकरी आंदोलकांनी पुकारलेल्या भारत बंदच्या आजचे आजच्या सुरुवातीलाच आंदोलकांनी निदर्शने करण्यावर भर दिला आहे. दिल्लीची बोर्डर चहूकडून बंद करण्याचा त्यांचा प्रयत्न आहेच. त्याचबरोबर विरोधी पक्षांची सरकारे असलेल्या राज्यांच्या राजधान्यांमध्ये तसेच मोठ्या शहरांमध्ये सकाळी सुरुवातीलाच निदर्शने करून घेण्यावर आंदोलकांनी भर दिला आहे. यातून भारत बंदला चांगला प्रतिसाद मिळाल्याचा दावा त्यांना करता येईल. Farmers call bharat bandh today against three agricultural laws
भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकेकर यांनी दुकानदारांना आज दुपारी चार वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. वैद्यकीय सेवा तसेच तातडीच्या सेवा यांना मी भारत बंद म्हणून वगळले आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले आहे. परंतु एकूणच आंदोलकांचा कल भारत बंद पेक्षा मोठ्या प्रमाणावर निदर्शने करून शक्तिप्रदर्शन करण्याचा दिसतो आहे. दिल्लीपासून पाटण्यापर्यंत आणि पाटण्यापासून चेन्नईपर्यंत सर्व मोठ्या शहरांमध्ये डाव्या पक्षांचे आणि काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचे चित्र दिसत आहे. काँग्रेसने या आंदोलनात सक्रिय सहभाग देण्याचा निर्णय घेतल्याचे कालच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले होते.
या बंदला विरोधी पक्षांसह अनेक संघटनांनी पाठिंबा दिला असून, काही राज्यांत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. केंद्राच्या तीन कृषी कायद्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गेल्या वर्षी २७ सप्टेंबरला मंजुरी दिली होती. त्यास एक वर्ष पूर्ण होत असताना हा ‘भारत बंद’ पुकारण्यात आला आहे. सकाळी ६ पासून दुपारी ४ वाजेपर्यंत पाळल्या जाणाऱ्या बंददरम्यान देशभरातील सर्व सरकारी व खासगी कार्यालये, शैक्षणिक व इतर संस्था, दुकाने, उद्योग आणि व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद राहतील, तसेच सार्वजनिक कार्यक्रम होणार नाहीत. तथापि, रुग्णालये, औषधांची दुकाने यांच्यासह सर्व अत्यावश्यक सेवा सुरू राहील. ऐच्छिक रीतीने व शांततेने हा बंद पाळला जाईल, अशी हमी संयुक्त किसान मोर्चाने दिली आहे. अनेक राजकीय पक्षांनी बंदला पाठिंबा जाहीर केला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांनी बंदला पाठिंबा असल्याचे सांगितले. बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते, राजद नेते तेजस्वी यादव यांनी आपण या देशव्यापी बंदमध्ये सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केले.
Karnataka: Various organizations protest outside Kalaburagi Central bus station as farmer organisatons call for Bharat Bandh today against 3 farm laws "Many organizations are supporting our farmers and participating in the nation-wide call for bandh," says protester K Neela pic.twitter.com/QQMyZUcqKH — ANI (@ANI) September 27, 2021
Karnataka: Various organizations protest outside Kalaburagi Central bus station as farmer organisatons call for Bharat Bandh today against 3 farm laws
"Many organizations are supporting our farmers and participating in the nation-wide call for bandh," says protester K Neela pic.twitter.com/QQMyZUcqKH
— ANI (@ANI) September 27, 2021
आंध्र प्रदेश सरकारने ‘भारत बंद’ला संपूर्ण पाठिंबा दिला आहे. रविवारी मध्यरात्रीपासून सोमवार दुपापर्यंत राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाडय़ा थांबवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे राज्याचे परिवहनमंत्री पर्णी वेंकटरामय्या यांनी सांगितले. सर्वानी या बंदमध्ये सहभागी होण्याचे आणि पक्ष कार्यकर्त्यांनी हा बंद यशस्वी करण्याचे आवाहन तमिळनाडूतील सत्ताधारी द्रमुकने केले आहे.
केरळमधील सत्ताधारी डाव्या आघाडीने शेतकऱ्यांबाबत एकजूट दर्शवण्यासाठी सोमवारी राज्यव्यापी बंदचे आवाहन केले आहे.
संयुक्त किसान मोर्चाच्या आवाहनावरून होत असलेल्या बंदमध्ये काँग्रेस सहभागी होणार असल्याचे पक्षाने शनिवारी जाहीर केले. गेल्या सात वर्षांत नरेंद्र मोदी सरकारने कृषी क्षेत्रावर पद्धतशीर हल्ले केले असून; या क्षेत्राच्या दुर्दशेसाठी हे सरकार जबाबदार असल्याचा आरोप पक्षाचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी केला.
ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन या संघटनेने बंदला पाठिंबा जाहीर केला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत त्यांच्याशी संवाद साधावा आणि तिन्ही कृषी कायदे मागे घ्यावेत, असे आवाहन त्यांनी सरकारला केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App