Farmer Protest : शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे बंद झालेला रस्ता खुला करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालय सुनावणी होणार आहे. नोएडा येथील रहिवाशाने न्यायालयात जनहित याचिका (पीआयएल) दाखल केली होती. ज्यावर यूपी आणि हरियाणा सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. न्यायालय सोमवारी म्हणजेच आज जनहित याचिकेवर सुनावणी करणार आहे. Farmer Protest Hearing in Supreme Court on whether NH-24 will open today, UP government had filed affidavit
विशेष प्रतिनिधी
लखनऊ : शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे बंद झालेला रस्ता खुला करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालय सुनावणी होणार आहे. नोएडा येथील रहिवाशाने न्यायालयात जनहित याचिका (पीआयएल) दाखल केली होती. ज्यावर यूपी आणि हरियाणा सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. न्यायालय सोमवारी म्हणजेच आज जनहित याचिकेवर सुनावणी करणार आहे.
यूपी सरकारने रविवारी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले, ज्यात असे म्हटले होते की, “सरकार न्यायालयाच्या आदेशानुसार रस्ते अडवल्याबद्दल शेतकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न करत आहे. उत्तर प्रदेश सरकारने सांगितले की, बहुतांश आंदोलकांमध्ये वृद्ध शेतकऱ्यांचा समावेश आहे.
यूपी सरकारने सुप्रीम कोर्टाने दिलेल्या नोटिसीला उत्तर म्हणून प्रतिज्ञापत्र दाखल केले. सरकारने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, गाझियाबाद, यूपी आणि दिल्लीदरम्यान महाराजपूर आणि हिंडन रस्त्यांवरून गाड्या सुरळीत चालण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, एनएच -24 अजूनही ब्लॉक आहे. जानेवारी, मार्च आणि पुन्हा एप्रिलमध्येही शेतकरी आंदोलकांनी NH-24 ला वारंवार अडवले होते.
Farmer Protest Hearing in Supreme Court on whether NH-24 will open today, UP government had filed affidavit
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App