आमने-सामने : लशीच्या उत्पादन वाढीसाठी पूनावाला यांना हवेत तीन हजार कोटी ; एम्स’चे प्रमुख डॉ.रणदीप गुलेरिया भडकले


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोनाने देशात हाहाकार सुरू आहे त्यातच आता लशीचा तुटवडा जाणवत आहे.यावर सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी आता लशीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणखी तीन हजार कोटी रुपयांचा निधी लागेल, अशी जाहीर कबुली दिली .यावरुन आता ‘एम्स’चे प्रमुख डॉ.रणदीप गुलेरिया हे पूनावाला यांच्यावर भडकले आहेत. Face-to-face: Poonawala earns Rs 3,000 crore to increase vaccine production

डॉ.गुलेरिया म्हणाले लशीचे उत्पादन करणाऱ्या कंपनीला हे लक्षात यायला हवे. यासाठी कोणत्याही रॉकेट सायन्सची गरज नाही. केवळ भारतालाच नव्हे तर जगाला लशीचा पुरवाठ करायचा आहे हे त्यांना माहिती होते. तसेच, मागणीही मोठी असणार हेसुद्धा आधीच उघड झालेले.त्यांनी कोठून निधी मिळवावा याविषयी मी सल्ला देणार नाही. जगाला आता लस हवी आहे. आपल्याकडे सध्या ५० लशींवर वैद्यकीय चाचण्या सुरू आहेत. हे केवळ मानवतेच्या दृष्टिकोनातून नव्हे तर बाजार मूल्याचा विचार करुनही सुरू आहे, असे गुलेरिया यांनी सांगितले.

काय म्हणाले होते अदर पूनावाला ?

सिरमच्या उत्पादन प्रकल्पावर मोठा ताण आला आहे. सिरमकडून दर महिन्याला 6 ते 6.5 कोटी डोसचे उत्पादन होत आहे. आतापर्यंत आम्ही केंद्र सरकारला 10 कोटी डोस दिले असून, 6 कोटी डोस निर्यात केले आहेत. देशातील प्रत्येकाला लस द्यायची झाल्यास तेवढे उत्पादन आता सध्या घेऊ शकत नाही. सर्व जगाला लस हवी आहे. परंतु, आम्ही सध्या भारताच्या गरजेवर लक्ष केंद्रित केले आहे. असे असले तरी प्रत्येक भारतीयाला लस देणे आम्हाला सध्या तरी शक्य होत नाही.

सिरमकडून सवलतीच्या दरात केंद्र सरकारला कोरोना लस दिली जात आहे. यामुळे आम्हाला लशीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणखी 3 हजार कोटी रुपयांची गरज आहे. जूनपर्यंत उत्पादन वाढवायचे झाल्यास एवढा मोठा निधी लागेल. आम्ही केंद्र सरकारला 150 ते 160 रुपयांना लस देत आहोत. या लशीची सर्वसाधारण किंमत 20 डॉलर (सुमारे 1 हजार 500 रुपये) आहे. केंद्र सरकारने विनंती केल्यामुळे आम्ही सवलतीच्या दरात लस देत आहोत. यामुळे आम्हाला फारसा नफा होत नाही. याचा परिणाम लशीचे उत्पादन वाढवण्यावर होत आहे, असे पूनावाला यांनी सांगितले होते.

आम्हाला 3 हजार कोटींचा निधी मिळाल्यास लशीचे उत्पादन तीन महिन्यांत वाढू शकेल. असे पूनावाला यांनी स्पष्ट केले होते.

गुलेरिया यांनी म्हटले आहे की, जागतिक पातळीवर कोरोना लशीचा तुटवडा जाणवणार हे सहा महिन्यांपूर्वीचे स्पष्ट झाले होते.

Face-to-face: Poonawala earns Rs 3,000 crore to increase vaccine production

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण