दिल्लीतील एका ट्रायल कोर्टाने सीबीआयच्या प्राथमिक तपासात क्लीन चिट देणारी रिपोर्ट लीक होण्यावर महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भूमिकेची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, जरी देशमुख यांना सीबीआयच्या आरोपपत्रात आरोपी बनवले गेले नसले तरी ते एखाद्या मोठ्या कटाचा भाग असू शकतात, कारण ते प्राथमिक प्रकरणातील कंटेंट लीकचे सर्वात मोठे लाभार्थी आहेत. extrortion case Anil Deshmukh’s clean chit report leaked, court says Deshmukh’s role in the case should be investigated
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : दिल्लीतील एका ट्रायल कोर्टाने सीबीआयच्या प्राथमिक तपासात क्लीन चिट देणारी रिपोर्ट लीक होण्यावर महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भूमिकेची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, जरी देशमुख यांना सीबीआयच्या आरोपपत्रात आरोपी बनवले गेले नसले तरी ते एखाद्या मोठ्या कटाचा भाग असू शकतात, कारण ते प्राथमिक प्रकरणातील कंटेंट लीकचे सर्वात मोठे लाभार्थी आहेत.
कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, “असे वाटतेय की, सीबीआयने गाडी खेचणारे इंजिन/घोडा सोडून दिले आहे, यामुळे फक्त गाडीतून प्रवास करणाऱ्यांवर आरोप लावले जात आहेत. तथापि, इंजिन किंवा घोड्याने गाडी ओढल्याशिवाय गाडीचा प्रवास किंवा षडयंत्र शक्य झाले नसते. स्पष्टपणे, भरपूर पुरावे असूनही असे दिसते की चांगल्या प्रकारे कारणे माहीत असूनही सीबीआयने फक्त दुव्यांना आरोपी बनवले आहे, तर कमान हाती असणाऱ्या मास्टर माइंड व्यक्तीला सोडले आहे.
त्यामुळे सीबीआयला या प्रकरणात अनिल देशमुख यांच्या भूमिकेची योग्य तपशिलाने आणि कालबद्ध पद्धतीने चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाने सीबीआयला याप्रकरणी 4 आठवड्यांच्या आत ‘कोणतेही अपयश न येता’ स्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App