चांदीवाल कमिशनने गैरहजेरीबद्दल अनिल देशमुख आणि वकिलांना ठोठावला ५० हजार रुपयांचा दंड!!


वृत्तसंस्था

मुंबई : मुंबईतील हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार चालकांकडून 100 कोटी रुपयांची खंडणी वसूल करण्याच्या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या चांदीवाल कमिशनने माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांच्या वकिलांना पन्नास हजारांचा दंड ठोठावला आहे. Chandiwal Commission imposes a fine of Rs 50,000 on former Maharashtra Home Minister Anil Deshmukh

बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे चांदीवाल कमिशन ने केलेल्या चौकशीच्या वेळी माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग आणि अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप आणि दावे यांच्याबद्दल अनिल देशमुख यांची उलटतपासणी घ्यायची होती. परंतु देशमुख हे स्वतः आणि त्यांचे वकील चांदीवाल कमिशनसमोर उलट तपासणीला हजरच राहिले नाही नाहीत. म्हणून त्या दोघांनाही चांदीवाल कमिशनने 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

अनिल देशमुख यांनी हा दंड भरल्यानंतर तो महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री रिलीफ फंडात आत जमा करण्यात येणार आहे. स्वतः चांदीवाल यांनी ही माहिती दिली आहे. उलट तपासणीला हजर न राहिल्याबद्दल चौकशी आयोगाने थेट माजी गृहमंत्र्यांना दंडे ठोठावल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Chandiwal Commission imposes a fine of Rs 50,000 on former Maharashtra Home Minister Anil Deshmukh

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात