Jammu Airport Blast : जम्मू एअरफोर्स स्टेशनच्या तांत्रिक भागाजवळ स्फोट झाल्यामुळे हवाई दलाचे दोन जवान किरकोळ जखम झाले आहेत. वृत्तसंस्था एएनआयच्या माहितीनुसार, येथे 5 मिनिटांच्या अंतराने दोन स्फोट घडले. पहिला स्फोट कॅम्पस इमारतीच्या छतावर आणि दुसरा खाली झाला. एएनआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे स्फोट घडवण्यासाठी दोन ड्रोन वापरण्यात आले. हल्लेखोरांचा शोध लागलेला नाही, परंतु स्फोट क्षेत्रात उभ्या असलेल्या विमानांना त्यांनी लक्ष्य केले, असा संशय आहे. Explosion Inside Jammu Airport Jammu Airport Blast, Forensic Team Reaches The Spot
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : जम्मू एअरफोर्स स्टेशनच्या तांत्रिक भागाजवळ स्फोट झाल्यामुळे हवाई दलाचे दोन जवान किरकोळ जखम झाले आहेत. वृत्तसंस्था एएनआयच्या माहितीनुसार, येथे 5 मिनिटांच्या अंतराने दोन स्फोट घडले. पहिला स्फोट कॅम्पस इमारतीच्या छतावर आणि दुसरा खाली झाला. एएनआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे स्फोट घडवण्यासाठी दोन ड्रोन वापरण्यात आले. हल्लेखोरांचा शोध लागलेला नाही, परंतु स्फोट क्षेत्रात उभ्या असलेल्या विमानांना त्यांनी लक्ष्य केले, असा संशय आहे.
#UPDATE | FIR registered under Unlawful Activities (Prevention) Act after two low-intensity explosions were reported earlier today at Jammu Air Force Station. Investigation underway: Jammu & Kashmir Police — ANI (@ANI) June 27, 2021
#UPDATE | FIR registered under Unlawful Activities (Prevention) Act after two low-intensity explosions were reported earlier today at Jammu Air Force Station. Investigation underway: Jammu & Kashmir Police
— ANI (@ANI) June 27, 2021
दूर स्फोट झाल्याचा आवाज ऐकू आला. शनिवारी मध्यरात्रीनंतर 1.45 च्या सुमारास ही घटना घडली. जम्मूचे मुख्य विमानतळही याच परिसरात येते, जिथे ही घटना घडली. हवाई दल, नौदल आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थितीची माहिती घेतली. भारतीय वायुसेनेची एक उच्चस्तरीय टीम या घटनेची चौकशी करणार आहे.
There was no damage to any equipment. Investigation is in progress along with civil agencies. — Indian Air Force (@IAF_MCC) June 27, 2021
There was no damage to any equipment. Investigation is in progress along with civil agencies.
— Indian Air Force (@IAF_MCC) June 27, 2021
जम्मूच्या एअरफोर्स स्टेशनवर झालेल्या घटनेसंदर्भात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी एअर चीफ मार्शल एचएस अरोरा यांच्याशी चर्चा केली. संरक्षण मंत्री कार्यालयाच्या म्हणण्यानुसार, एअर मार्शल विक्रम सिंह परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जम्मूला पोहोचत आहेत.
या घटनेवर भारतीय वायुसेनेचे म्हणणे आहे की, रविवारी कमी तीव्रतेचे दोन स्फोट घडले. एका स्फोटामुळे इमारतीच्या छताला किरकोळ नुकसान झाले, तर दुसर्याचा स्फोट मोकळ्या जागेत झाला. कोणत्याही उपकरणांचे नुकसान झाले नाही. तपास सुरू आहे.
दुसरीकडे जम्मू-काश्मीर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. नरवाल परिसरातून पोलिसांनी एका दहशतवाद्यास अटक केली आहे. त्याच्याकडून 5 किलो आयईडी जप्त करण्यात आला आहे. तपास अजून सुरू आहे.
Explosion Inside Jammu Airport Jammu Airport Blast, Forensic Team Reaches The Spot
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App