ओमायक्रॉनला कोरोनावरील नैसर्गिक लस म्हणणे धोकादायक, बेजबाबदारपणे याची चर्चा करणे चुकीचे असल्याचे तज्ज्ञांचे मत

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील एका आरोग्य अधिकाऱ्याने ओमायक्रॉनला कोरोनावरील नैसर्गिक लस म्हटले आहे. मात्र, अशा प्रकारचे बेजबाबदार वक्तव्य अत्यंत धोकादायक आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.महाराष्ट्रातील एका आरोग्य अधिकाऱ्या ने म्हटले होते की ओमायक्रॉन विषाणू हा एखाद्या नैसर्गिक लसीसारखा आहे.Experts say it is wrong to call Omycron a natural vaccine for corona, irresponsibly discussing it.

त्यामुळे कोरोना कमी होण्यास मदत होईल. या अधिकाऱ्याच्या मतावर तज्ज्ञांनी टीका केली आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार ओमायक्रॉन व्हेरिएंटचा सर्वाधिक वेगाने पसरला आहे. यामुळे जास्त मृत्यू होत नाही अशा प्रकारचे दावे केले जात आहे. मात्र, प्रसिध्द व्हायरॉलॉजिस्ट शाहिद जमील यांच्या म्हणण्यानुसार ओमायक्रॉनला नैसर्गिक लस मानणे अत्यंत धोकादायक विचार आहे.



जे लोक अशा प्रकारची वक्तव्ये करत आहेत त्यांना अद्याप ओमायक्रॉनचे गांभिर्य समजलेच नाही. याचे कारण म्हणजे ओमायक्रॉनबाबत आपल्याकडे खूप कमी माहिती आहे. भारतासारख्या देशात कुपोषण, वायू प्रदूषण, मधुमेह यासारख्या समस्या आहेत. ओमायक्रॉनसारख्या विषाणूमुळे त्यांच्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. या लोकांना संसर्ग झाला तर ते चांगले होणार नाही.

पब्लिक हेल्थ फाऊंडेशन ऑफ इंडियामधील प्रा. गिरिधर बाबू म्हणाले की ओमायक्रॉनमुळे होणारा संसर्ग फार गंभीर नसला तरी कोणत्याही परिस्थितीत त्याला नैसर्गिक लस म्हणणे योग्य होणार नाही. त्यामुळे चुकीची माहिती पसरविण्यापासून लोकांनारोखले पाहिजे.

उजाला सिग्नस ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सचे संस्थापक संचालक शुचिन बजाज यांनी सांगितले की कोरोनाचा परिणाम हा दीर्घकालीन होऊ शकतो. अभ्यासात दिसून आले आहे की केवळ फुफुस्सांवरच नव्हे तर ह्रदय आणि किडनीवरही या विषाणूचा परिणाम होतो. विषाणू सहा महिन्यांपर्यंत तेथे राहू शकतो.

Experts say it is wrong to call Omycron a natural vaccine for corona, irresponsibly discussing it.

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात