वर्क फ्रॉम होम सर्वांनाच आवडले ; ८२ टक्के कर्मचाऱ्यांना ऑफिसला जायचेच नाही


विशेष प्रतिनिधी

मुंबई : कोरोनामुळे जीवनात अभूतपूर्व बदल होत असताना, लोक आता ऑफिसला जाण्यापेक्षा घरी राहून काम करण्यास प्राधान्य देत असल्याचे अभ्यासातून दिसून आले आहे. वर्क फ्रॉम होम सर्वांनाच आवडल्याचे एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. Everyone loved the work from home; 82% of employees do not want to go to the office

वेबसाईट सायकीच्या ‘टेक टॅलेंट आउटलुक’ अहवालानुसार, कर्मचाऱ्यांवर दूरस्थपणे काम करण्याची प्रणाली लादली होती. परंतु आता दोन वर्षानंतर ‘वर्क फ्रॉम होम’ हा आता ‘नवा ट्रेंड’ बनला आहे. या सवयीनं लोकांच्या जीवनात स्थान निर्माण केले आहे. पाहणीत असे अढळले की ८२ टक्के लोकांना घरून काम करायला आवडले आहे.

संशोधनातील गोष्टी

टॅलेंट टेक आउटलुक २०२२ चार खंडांमधील १०० हून अधिक अधिकारी आणि मानव संसाधन अधिकारी यांचा अभ्यास केला. सोशल मीडिया, मुलाखती आणि पॅनल डिस्कशनच्या माध्यमातून हे सर्वेक्षण करण्यात आले. अभ्यासात सहभागी असलेल्या ६४ टक्के कर्मचाऱ्यांनी सांगितले की, घरून काम केल्याने त्यांची उत्पादकता वाढते आणि तणाव कमी होतो.

दरम्यान, ८० टक्क्यांहून अधिक एचआर व्यवस्थापकांनी सांगितले की त्यांच्यासाठी पूर्णवेळ कार्यालयात जाणारे कर्मचारी शोधणे कठीण होत आहे. त्याच वेळी, ६७ टक्क्यांहून अधिक कंपन्यांनी असेही म्हटले की त्यांना ऑफिसमध्ये काम करणारे लोक कमी आहेत.

Everyone loved the work from home; 82% of employees do not want to go to the office

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात