प्रत्येक देशाकडे मोदींसारखा नेता हवा, स्टॉप टीबी पार्टनरशिपच्या संचालकांनी केले कौतुक, म्हणाल्या- 2025 पर्यंत भारतातून होईल क्षयरोगाचे उच्चाटन


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : स्टॉप टीबी पार्टनरशिपच्या कार्यकारी संचालक डॉ. लुसिका डिटीयू यांनी गुरुवारी सांगितले की, भारत 2025 पर्यंत क्षयरोग (टीबी) नष्ट करेल हे सांगण्यास मला कोणताही संकोच वाटत नाही.Every country needs a leader like Modi, the director of Stop TB Partnership praised, said- TB will be eradicated from India by 2025

वृत्तसंस्थेला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत त्या म्हणाल्या, “मला वाटते की आर्थिक संसाधने येतील आणि या उपक्रमांची अंमलबजावणी सुलभ होईल आणि शेवटची गोष्ट म्हणजे, सेवांचे शक्य तितके विकेंद्रीकरण करणे. प्रत्येकजण क्षयरोग असलेल्या लोकांच्या जवळ जातो. लहान समुदायांमध्ये, शहरांच्या लहान भागात खेड्यांत आणि अशाच प्रकारे आपण हा पाया तयार करतो. आता भारतात दिसणारी साधने पाहता भारतातून 2025 पर्यंत क्षयरोगाचा अंत होईल हे सांगायला मला कोणताही संकोच वाटत नाही.”



प्रत्येक देशाकडे हवा मोदींसारखा नेता

डॉ. लुसिका म्हणाल्या की,” प्रत्येक देशाकडे मोदींसारखा नेता असायला हवा, ज्यांना खरोखरच लोकांची काळजी आहे, विशेषत: क्षयरोग्यांची. मला वाटते की ही राजकीय बांधिलकी राखणे खूप महत्वाचे आहे. तुम्हाला माहिती आहे की, अनेक देशांमध्ये उदाहरणार्थ बरेचदा लोक सरकार किंवा आरोग्य मंत्री बदलतात. परंतु भारताचे लक्ष टीबीवर आहे. त्यामुळे सर्वात मोठे आव्हान ही राजकीय बांधिलकी टिकवून ठेवण्याचे. पंतप्रधान मोदी आणि आरोग्य मंत्र्यांनी टीबी निर्मूलन कार्यक्रमावर पुरेपूर लक्ष केंद्रित केलेले आहे.”

डॉ.लुसिकाने पुढे माहिती दिली की, 2025 पर्यंत क्षयरोगाचे उच्चाटन करण्याची भारताची योजना आहे. आम्ही याबद्दल पूर्णपणे समाधानी आहोत. भारताकडे केवळ योजनाच नाही तर त्यासाठीचे बजेटदेखील आहे. 2018 मध्ये पंतप्रधान मोदींनी 2025 पर्यंत क्षयरोगाचा नायनाट करायचा, अशी जोरदार भूमिका घेतली. एवढेच नाही, यासाठी आरोग्य मंत्रालय आणि सरकारच्या संपूर्ण टीमने एक योजना आखली. योजना, नावीन्यपूर्ण पद्धीती, भरपूर मेहनत आणि महत्त्वाकांक्षेमुळे त्याचे परिणाम दिसून येत आहेत.”

“म्हणून आम्ही खरोखरच खूप आनंदी आहोत, केवळ भारतीय लोकांसाठीच नाही, कारण ते सर्वात महत्त्वाचे आहे, तर जगासाठीही. कारण आमच्याकडे एक उदाहरण आहे जे इतर देशांनी पाळले पाहिजे आणि त्यांचे पालन केले पाहिजे.

“भारत ज्या स्तरावर आणि ज्या प्रमाणात हे करण्याची योजना आखत आहे त्यावरून वाटते की, ते अभूतपूर्व आहे. आणि हे केवळ इथे भारतातच केले जात आहे, आमच्याकडे इतर कोणत्याही देशात नाही.

Every country needs a leader like Modi, the director of Stop TB Partnership praised, said- TB will be eradicated from India by 2025

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात