भवानीपूरचा निकाल जाहीर होण्याआधीच ममतांच्या पक्षाचा विजयी उन्माद


वृत्तसंस्था

भवानीपूर / कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये भवानीपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विरुद्ध भाजपचा उमेदवार प्रियांका टिबरेवाल यांच्या निवडणुकीचा फैसला होण्यापूर्वीच ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विजयी उन्माद सुरू केला आहे. मतमोजणीच्या फक्त तीन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. त्यामध्ये ममता बॅनर्जी या 2,227 मतांनी आघाडीवर आहेत. तरी देखील कोलकत्यात ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानासमोर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जमून ढोल-ताशे वाजवायला सुरुवात केली आहे. Even before the Bhawanipur result was declared, Mamata’s party was in a frenzy



वास्तविक भवानीपूर हा ममता बॅनर्जी यांचा घरचा मतदारसंघ आहे. त्या नंदिग्राम मध्ये सुवेंदू अधिकारी यांच्यासमोर हरल्याने भवानीपूर मध्ये पोटनिवडणूक घ्यावी लागत आहे. या पोटनिवडणुकीत त्या निवडून आल्या नाहीत, तर त्यांना मुख्यमंत्रिपद गमवावे लागणार आहे. भवानीपूरच्या प्रचार सभांमध्ये वारंवार त्यांनी हे सांगितले आहे.

भवानीपूर हा घरचाच मतदारसंघ असल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. तरी देखील प्रियांका टिबरेवाल यांनी त्यांना चांगली टक्कर दिलेली दिसत आहे. ममतांचे नेमके मार्जिन किती कमी करता येईल यावर प्रियांका टिबरेवाल्यांचा भर राहिला होता. त्यात भाजप आणि त्या स्वतः यशस्वी ठरलेल्या दिसत आहेत. एवढे असूनही ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपला प्रचंड विजय झाला असल्याच्या थाटात विजयाच्या उन्मादाला सुरुवात केली आहे.

Even before the Bhawanipur result was declared, Mamata’s party was in a frenzy

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात