वृत्तसंस्था
नवी दिल्ली : युरोपातील देशांमध्ये भीषण गरमी सुरू आहे. यूकेमध्ये आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. तेथे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. लोकांना उन्हापासून दूर राहण्याचा इशाराही देण्यात आला आहे. पोर्तुगाल, स्पेन, फ्रान्स आणि क्रोएशिया यांसारख्या देशांमध्ये जंगलात आग लागली आहे. त्यामुळे तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. वातावरणातील बदल हे या उष्णतेचे कारण असल्याचे बोलले जात आहे.European countries hit by heat Portugal, France cross 40 degree Celsius; Red alert in UK, 237 dead in heat wave in Spain
केंब्रिजमध्ये 25 जुलै 2019 रोजी यूकेतील सर्वाधिक तापमान 38.7 डिग्री सेल्सियस नोंदवले गेले. आता हा विक्रम मोडीत निघाल्याचे येथील हवामान विभागाचे म्हणणे आहे. तापमान 40 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. गंभीर परिस्थिती पाहता हजारो लोकांना घरे सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी बचाव पथक लोकांना बाहेर काढण्यात व्यग्र आहे.
युरोपातील मोठा भाग सध्या उष्णतेने होरपळत आहे. जगभरातील पर्यटक उन्हाळ्याच्या सुटीसाठी येथे येतात. मात्र यावेळी युरोपीय देशांना उन्हाचा तडाखा बसला आहे. अनेक देशांनी याला राष्ट्रीय संकट घोषित केले आहे.
स्पेनमधील दुष्काळामुळे जंगलात आग लागली आहे. त्यामुळे येथील सरासरी तापमानात वाढ झाली आहे. ही हवामान संकटाची नांदी असल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
स्पेनमधील अग्निशमन दलाचे जवान जंगलातील आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी झटत आहेत. येथे 4000 हेक्टर क्षेत्र जळून राख झाले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App