वृत्तसंस्था
नवी दिल्ली : आसाममधील आयपीएस अधिकारी संजुक्ता पराशर यांचे नाव ऐकताच दहशतवाद्यांचा थरकाप उडतो. त्यांच्या नावाच्या आधी हिंमत, वीरता आणि साहस या शब्दाचे सर्व समानार्थी शब्द असून गेल्या पंधरा महिन्यांत त्यांनी १६ दहशतवाद्यांचा ‘एन्काउंटर’ केला आहे. त्या चक्क एके-४७ बंदूक घेऊन गस्त घालतात. ‘Encounter’ of 16 terrorists in 15 months; She patrol with AK-47 rifle
संजुक्ता या सुरक्षा दलाच्या स्टार ऑफिसर असून दहशतवाद्यांसाठी कर्दनकाळ आहेत. आसामच्या दुर्गम जंगलांमध्ये त्या एके-४७ बंदूक घेऊन टीमसोबत गस्त घालत दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी प्रसिद्ध आहेत.
‘द बेटर इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार संजुक्ता यांचा जन्म आसामचा आहे. तेथेच शालेय शिक्षण तर दिल्लीमधील इंद्रप्रस्थ कॉलेजमधून राज्यशास्त्र या विषयामध्ये पदवीपर्यंतचं शिक्षण घेतले. जवाहरलाल नेहरु विद्यापीठामधून आंतरराष्ट्रीय संबंध या विषयामध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्यानंतर अमेरिकन परराष्ट्र नितीमध्ये एमफील आणि पीएचडीचा अभ्यास केला. संजुक्ता यांनी युपीएससीच्या परीक्षेमध्ये देशात ८५ वा क्रमांक मिळवला. त्या २००६ च्या तुकडीच्या आयपीएस अधिकारी आहेत. संजुक्ता यांनी मेघालय आणि आसाम कॅडरची निवड केली आणि सेवेत रुजू झाल्या.
२००८ मध्ये त्यांची पहिली पोस्टींग आसाममधील माकूम येथे सहाय्यक कमांडर म्हणून झाली. बोडो आणि बंगलादेशमधील उदालगीरांमधील संघर्ष रोखण्यासाठी तुकडीसोबत पाठवण्यात आले. दहशतवादी संघटनांच्या जीवे मारण्याच्या धमक्यांना त्यांनी भीक घातली नाही. सध्या संजुक्ता हे नाव दहशतवाद्यांसाठी कर्दनकाळ ठरत असल्याने दहशतवादी त्यांनाघाबरुनच असतात.
२०१५ मध्ये संजुक्ता यांनी बोडो दहशतवाद्यांविरोधातील मोहिमेचं नेतृत्व केले. १६ दहशतवाद्यांना ठार करण्याबरोबरच शेकडो टन स्फोटकेही त्यांनी पकडून दिली. केवळ १५ महिन्यांत त्यांनी ही कामगिरी केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App