प्रतिनिधी
मुंबई : निवडणूक अजून दोन वर्षे लांबवर, पण राणा -“ओवैसींचा मध्येच “दम भर” सुरू झाले आहे….!! Elections 2 more years away; Rana – Owaisi’s
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा 14 दिवसानंतर बाहेर आल्या. लीलावती रुग्णालयात भरती झाल्या. तेथून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रातून कोठूनही निवडणूक लढवून दाखवा. मी तुमच्याविरुद्ध उभी राहीन,असा दम भरला आहे.
त्यावर महाराष्ट्रात राजकीय गदारोळ उडाला असताना दुसरीकडे हैदराबादचे एमआयएमचे खासदार असदुद्दिन ओवेसी यांनी काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांना दम भरला आहे. वायनाड मध्ये तुम्ही पराभूत होणारच आहात. आता हैदराबाद मध्ये किंवा मेडक मध्ये येऊन निवडणूक लढवून दाखवा, असे आव्हान असदुद्दीन ओवैसी यांनी राहुल गांधींना दिले आहे.
महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या आणि देशातल्या लोकसभेच्या निवडणुका अजून दोन वर्षे लांब आहेत. तरी देखील नवनीत राणा आणि असदुद्दीन ओवैसी यांनी मात्र दंड थोपटत अनुक्रमे उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांना आव्हान देऊन निवडणुकीआधीच दम भरला आहे.
– मुंबई महापालिका टार्गेटवर
अर्थात मुंबई महापालिकेच्या निवडणुका येत्या काही दिवसात जाहीर होतील. त्यामुळे नवनीत राणा यांच्या टार्गेटवर मुंबई महापालिकेची निवडणूक असेल. अर्थातच त्यांनी स्वतः जाहीर केल्याप्रमाणे या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध जोरदार प्रचार करणार आहेत. त्याचा परिणाम काय होईल??, हा भाग अलाहिदा. पण त्यांनी निवडणुकीला अजून 2 वर्षे शिल्लक असताना मुख्यमंत्र्यांना थेट निवडणूक लढवून दाखवण्याचा दम भरून आपले राजकीय महत्त्व वाढविण्याचा पुन्हा एकदा नक्की प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App