आरएसपीच्या उमेदवाराचे निधन झाल्याने पश्चिम बंगालमधील जानगीपूर मतदारसंघातील निवडणूक स्थगित


पश्चिम बंगालमधील जानगीपूर विधानसभा मतदारसंघातील रेव्होल्यूशनरी सोशालिस्ट पार्टीचे (आरएसपी) उमेदवार प्रदीपकुमार नंदी यांचे कोरोनामुळे निधन झाल्याने निवडणूक आयोगाने येथील निवडणूक स्थगित ठेवली आहे. या मतदारसंघात सातव्या टप्यात मतदान होणार होते.Election postponed in Jangipur constituency in West Bengal due to death of RSP candidate


विशेष प्रतिनिधी

कोलकत्ता : पश्चिम बंगालमधील जानगीपूर विधानसभा मतदारसंघातील रेव्होल्यूशनरी सोशालिस्ट पार्टीचे (आरएसपी) उमेदवार प्रदीपकुमार नंदी यांचे कोरोनामुळे निधन झाल्याने निवडणूक आयोगाने येथील निवडणूक स्थगित ठेवली आहे.

या मतदारसंघात सातव्या टप्यात मतदान होणार होते.मुर्शिदाबाद जिल्ह्यातील जानगीपूरमधील आरएसपीचे उमेदवार नंदी यांचे शुक्रवारी रात्री कोरोनामुळे निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते. गेल्या आठवड्यात ते कोरोनाबाधित असल्याचे समजले होते.



तेव्हपासून ते आयसोलेशनमध्ये होते. मात्र, नंतर त्यांची तब्येत जास्त बिघडल्याने रुग्णालयात हलविण्यात आले. जानगीपूर मतदारसंघातून तृणमूल कॉँग्रेसतर्फे झाकीर हुसेन आणि भाजपातर्फे सुजीत दास हे निवडणूक रिंगणात आहेत.

पश्चिम बंगालमध्ये आठ टप्यांत मतदान होत आहे. शनिवारी पाचव्या टप्यातील मतदान होणार आहे. २ मे रोजी मतमोजणी होणार आहे.

Election postponed in Jangipur constituency in West Bengal due to death of RSP candidate

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात