पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज लागले आहेत. या विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा पंजाबमध्ये चरणजित सिंग चन्नी आणि उत्तराखंडमध्ये पुष्कर सिंग धामी आणि हरीश रावत यांच्यासारख्या राजकीय नेत्यांवर लागल्या .ELECTION 2022: Who won-who lost …VIP lost! Defeat of CM Channi, Amarinder, Harish Rawat, Pushkar Singh Dhami, Sukhbir Badal
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंजाबमध्ये आम आदमी पक्षाच्या त्सुनामीने अनेक मोठे दिग्गज नेस्तनाबूत केले आहेत. यामध्ये मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी, उपमुख्यमंत्री ओपी सोनी, पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू, शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल, माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांच्या नावांचा समावेश आहे. दुसरीकडे उत्तराखंडमध्ये सीएम पुष्कर सिंह धामी आणि हरीश रावत यांसारख्या अनेक दिग्गजांचा पराभव झाला आहे.
पाहा या निवणुकीत पराभूत झालेले दिग्गज…
चरणजीत सिंह चन्नी : पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यावेळी दोन जागांवरून रिंगणात होते. भदौर आणि चमकौर साहिब या दोन्ही जागांवरून त्यांचा पराभव झाला आहे. चन्नी यांचा चमकौर साहिबमधून आम आदमी पक्षाच्या चरणजीत यांनी पराभव केला आहे. त्याचबरोबर भदौरमधून लब सिंह यांनी चन्नी यांचा पराभव केला आहे. भदोरमधून चन्नीला पराभूत करणारा लब सिंग मोबाईल दुरुस्तीच्या दुकानात काम करतो.
नवज्योत सिंग सिद्धू : पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांचाही अमृतसर पूर्व मतदारसंघातून पराभव झाला आहे. सिद्धू यांचा आम आदमी पक्षाच्या जीवन ज्योत कौर यांनी पराभव केला आहे.
ओपी सोनी: पंजाबचे डेप्युटी सीएम ओपी सोनी अमृतसर सेंट्रलमधून निवडणूक रिंगणात होते. आम आदमी पक्षाचे अजय गुप्ता यांनी त्यांचा पराभव केला आहे.
अमरिंदर सिंग: पटियालाचे माजी मुख्यमंत्री आणि पंजाब लोक काँग्रेसचे प्रमुख कॅप्टन अमरिंदर सिंग यांचीही खुर्ची गेली. अमरिंदर सिंग यांचा आम आदमी पक्षाच्या अजित सिंह कोहलीने पराभव केला.
सुखबीर सिंग बादल:शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांचाही निवडणुकीत पराभव झाला आहे. ते जलालाबादमधून निवडणूक लढवत होते. आम आदमी पक्षाचे जगदीप कंबोज यांनी बादल यांचा पराभव केला.
प्रकाश सिंह बादल : शिरोमणी अकाली दलाचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल मागे पडले आहेत. आम आदमी पक्षाचे उमेदवार गुरमीत सिंग खुदियान जवळपास 15,000 मतांनी आघाडीवर आहेत.
बिक्रम सिंह मजिठिया: शिरोमणी अकाली दलाचे नेते आणि नवज्योतसिंग सिद्धू यांचे कट्टर विरोधक बिक्रम सिंह मजिठिया हे देखील अमृतसर पूर्वमधून निवडणूक हरले आहेत.
फाजिलनगर : माजी मंत्री स्वामी प्रसाद मौर्य हारले
योगी सरकारमध्ये मंत्री असलेले आणि सपामध्ये दाखल झालेले स्वामी प्रसाद मौर्य यांचा पराभव झाला आहे. ती एक कठीण लढत होती आणि अखेरीस त्यांनी जागा गमावली. या जागेवरून भाजपचे उमेदवार सुरेंद्र कुशवाह यांचा विजय
खातिमा: मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी
उत्तराखंडच्या खतिमा विधानसभा मतदारसंघातून भाजपला मोठा धक्का बसला आहे. या जागेवरून उमेदवार सीएम पुष्कम सिंह धामी यांचा पराभव झाला आहे. भाजप हायकमांडने अचानक धामी यांची मुख्यमंत्रीपदी घोषणा करून सर्वांनाच चकित केले होते. भाजपला पुन्हा सत्तेत आणण्याचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर होतं, ते त्यांनी पूर्ण केलं पण स्वत:चा पराभव झाला.
लालकुआन: माजी मुख्यमंत्री हरीश रावत
हरीश रावत उत्तराखंडच्या लालकुआन मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते, पण त्यांचा दारुण पराभव झाला. भाजपचे मोहन सिंग बिश्त यांनी त्यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. मुख्यमंत्री चेहरा जाहीर न केल्याने काँग्रेस हायकमांडशी त्यांची भांडणे झाली आणि त्यांनी निवृत्तीचे संकेत दिले. यानंतर काँग्रेस हायकमांडने त्यांची दखल घेतली आणि ते पूर्ण उत्साहात मैदानात उतरले.
पणजी: उत्पल पर्रीकर हारले.
यावेळी माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर गोव्यात अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. ते गोव्यातील पणजी मतदारसंघातून अपक्ष म्हणून रिंगणात उतरले .त्यांचे भाजपसोबत बरेच दिवस भांडण झाले आणि त्यांनी स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. माजी मुख्यमंत्र्यांचा मुलगा असल्याने या जागेच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य (मागे)
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य कौशांबीच्या सिरथू मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. केशव यांच्या विरोधात बहुजन समाज पक्षाने मुनसाब अली यांना उमेदवारी दिली आहे, तर समाजवादी पक्षाने पटेल बंधूच्या पल्लवी पटेल यांना तिकीट दिले आहे. सिरथूमध्ये पटेल मतदारांची भूमिका महत्त्वाची आहे.
अशा परिस्थितीत केशवप्रसाद मौर्य यांच्यासमोर मोठे आव्हान आहे.उत्तराखंडमध्ये आतापर्यंत आलेले निकाल आणि ट्रेंडमध्ये पुन्हा भाजपचे सरकार स्थापन होत आहे. उत्तराखंड या पहाडी राज्यात कोणताही पक्ष सलग दुसऱ्यांदा सत्तेत येत नाही, हा समज आता मोडीत निघणार आहे. पण निकाल आणि ट्रेंड पाहता भाजप हा विक्रम मोडून पुन्हा सरकार स्थापन करण्याच्या जवळ आहे. निवडणूक निकालांमध्ये सीएम पुष्कर सिंह धामी आणि हरीश रावत यांसारख्या अनेक दिग्गजांचा पराभव झाला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App